पत्रकारांसाठी भारत असुरक्षित

By admin | Published: December 29, 2015 07:48 PM2015-12-29T19:48:46+5:302015-12-29T19:48:46+5:30

माध्यामात काम करणाऱ्यांवर सतत हल्ले होतात आणि यामध्ये आशिया खंडात भारत सर्वात पुढे असल्याचं एका आघाडीच्या माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

India unsafe for journalists | पत्रकारांसाठी भारत असुरक्षित

पत्रकारांसाठी भारत असुरक्षित

Next

ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. २९ - माध्यामात काम करणाऱ्यांवर सतत हल्ले होतात आणि यामध्ये आशिया खंडात भारत सर्वात पुढे असल्याचं एका आघाडीच्या माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. पॅरीसमधील एका प्रमुख वृतप्रत्रसमुहाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारीतेवर दिवसे दिवस हल्ले होत असून यामध्ये आशिया खंडात भारत अग्रेसर असल्याच समोर आले आहे. ते रोखण्यासाठी शासन अपयशी ठरत असून जर पत्रकारांचे हल्ले रोखल्या गेले नाहीतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
२०१५ मध्ये जगातील ११० पत्रकार मारले गेले असून यामध्ये भारतातील ९ पत्रकारांचा समावेश असल्याच समजते आहे. यावरुनच भारतात पत्रकार किती सुरक्षित आहे हे दिसते.
ह्यरिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्सह्णच्या वार्षिक अहवालानुसार भारतात ९ पत्रकारांना यावर्षी आपला जीव गमावावा लागला असून त्यामध्ये काही पत्रकार गुन्हेगारी आणि राजकिय नेत्यांबाबत रिपोर्टिंग करत होते, तर काही शोधप्रत्रकारिता करत असताना त्यांना आपला जीव गमावाव लागला. भारतात आपले काम करताना ५ पत्रकार मारले गेले तर ४ जण मरण्याच कारण अस्पष्ट आहे.
आशिया खंडात भारत हा पत्रकारांसाठी सर्वात जास्त असुरक्षित आणि घातक देश असल्याच त्यांनी आपल्या अहवालात म्हटल आहे. भारतानंतर आशिया खंडात पत्रकांरावर होणाऱ्या हल्यात पाकिस्तान आणि अफगानिस्तानचा नंबर लागतो.

Web Title: India unsafe for journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.