‘याच पिढीत भारताला प्रगत राष्ट्र बनविणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 02:10 AM2016-12-25T02:10:25+5:302016-12-25T02:10:25+5:30

याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील

'India will create a nation in this generation' | ‘याच पिढीत भारताला प्रगत राष्ट्र बनविणार’

‘याच पिढीत भारताला प्रगत राष्ट्र बनविणार’

Next

पनवेल (रायगड) : याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे केले. पंतप्रधानांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहत परिसरामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सिक्युरिटी मार्केटचे (सेबी-एनआयएसएम) उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, मोठ्या प्रमाणावर ती विस्तारत आहे. आर्थिक वृत्तपत्र वाचताना आता समाधानकारक चित्र दिसते. मी नव्या उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो तेव्हा स्टार्टअपचा उपक्रम यशस्वी होत असल्याचे समाधान मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.
स्कील इंडियाच्या माध्यमातून देशातील उत्पादकता वाढविण्यासाठी युवकांची क्षमता वाढविण्यावर
भर देण्यात येत असल्याचे सांगून
मोदी म्हणाले, तरुणांना कौशल्यशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आव्हान स्वीकारण्यास ते तयार असले पाहिजेत. तसेच जनहितार्थ तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टसाठी बाजारातून भांडवल उभे केले पाहिजे, असे मत मोदींनी व्यक्त केले.
यशाचे मोजमाप करायचे असेल तर दलाल स्ट्रीटवर नव्हे, तर गावांमध्ये किती प्रभाव पडला हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मोदी म्हणाले, आर्थिक बाजारपेठेच्या शिक्षणामध्ये एनआयएसएम महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे.
मात्र भांडवली गुंतवणुकीपासून सामान्य जनता दूर आहे; त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर दूरदर्शी पायाभूत सुविधांवर भांडवली बाजारातील पैसा खर्च व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
मजबूत आणि निर्माणक्षम अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशहितासाठी जे जे निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील ते ते घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सेबीचे चेअरमन यू.के. सिन्हा तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सुरक्षा यंत्रणांचे पदाधिकारी, सेबीचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

एनआयएसएमचे होणार विद्यापीठ
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एनआयएसएमचे विद्यापीठ करण्याचा प्रस्ताव घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: 'India will create a nation in this generation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.