अग्निवीर अक्षय गवते शहीद; जनरल मनोज पांडे यांच्सयाह सर्व अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 02:25 PM2023-10-22T14:25:33+5:302023-10-22T14:28:54+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय लक्ष्मण गवते, ऑन ड्युटी शहीद झालेले पहिले अग्निवीर जवान आहेत.
Indian Army Agniveer: देशाचे रक्षण करण्यासाठी लाखो सैनिक सीमेवर तैनात आहेत. गेल्यावर्षी सरकारने अग्नीवीर योजनेद्वारे अनेकांची सैन्यात भरती केली. यातील एका अग्निवीर जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत.
Agniveer (Operator) Gawate Akshay Laxman is the first Agniveer to have laid down his life in operations. He was deployed in the world’s highest battlefield Siachen glacier. pic.twitter.com/kLJlpZ7Ylk
— ANI (@ANI) October 22, 2023
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपगळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कराने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली. तसेच, या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गवते कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचेही सांगितले. दरम्यान, अक्षय यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती आहे.
जनरल मनोज पांडे यांनी श्रद्धांजली वाहिली
सियाचीनच्या दुर्गम उंचीवर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि भारतीय लष्कराच्या सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जवान अक्षय, कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यांचे आईवडील शेती करतात. मृत्यूची माहिती मिळताच पिंपळगाव सराईमध्ये शोककळा पसरली आहे. 23 ऑक्टोबर रोजी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
General Manoj Pande #COAS and All Ranks of the #IndianArmy salute the supreme sacrifice of #Agniveer (Operator) Gawate Akshay Laxman, in the line of duty, in the unforgiving heights of #Siachen. #IndianArmy stands firm with the bereaved family in this hour of grief. https://t.co/eNkOXjjxxd
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) October 22, 2023
11 ऑक्टोबर रोजी एका अग्नीवीराची आत्महत्या
दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी अग्नीवीर अमृतपाल सिंग यांनी पुंछ सेक्टरमध्ये सेन्ट्री ड्युटीवर असताना आत्महत्या केली होती. लष्कराने अमृतपाल यांना गार्ड ऑफ ऑनर न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पण, आत्महत्यासारख्या परिस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जात नाहीत, असे सांगण्यात आले. दरवर्षी सुमारे 140 जवान आत्महत्या किंवा जखमी झाल्यामुळे आपला जीव गमावतात, असे लष्कराने म्हटले होते. अशा स्थितीत लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जात नाही.