कौतुकास्पद! कोरोनात अनाथ झालेल्या मुलामुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:44 AM2022-06-15T06:44:34+5:302022-06-15T06:44:48+5:30

कोरोना काळात आई किंवा वडिलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे.

Indian Jain Association to adopt orphaned children in Corona | कौतुकास्पद! कोरोनात अनाथ झालेल्या मुलामुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक

कौतुकास्पद! कोरोनात अनाथ झालेल्या मुलामुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक

googlenewsNext

उस्मानाबाद :

कोरोना काळात आई किंवा वडिलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे. याची नावनोंदणी सुरू असून पुणे येथील वाघोली प्रकल्पात शिक्षणासह सर्वप्रकारच्या भौतिक गरजा विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात येणार आहेत.  

कोविडमुळे अनाथ झालेल्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ वीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संघटनेकडून केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातून माहिती मागवण्यात येत आहे. पाचवी ते सातवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटनेच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे. एका कुटुंबातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना पुनर्वसन वसतिगृहात पाठविण्यासाठी त्यांच्या कायदेशीर पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील इच्छुकांनी संघटनेचे ॲड. शांतीलाल कोचेटा, कांचनमाला संगवे, ॲड. रोहन कोचेटा यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही पत्र ग्राह्य
- कोरोनात अनाथ झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नोंदणी शासनदरबारी नाही. तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदी झाल्या नाहीत. 
- यामुळे आता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना काळात पालकांचा मृत्यू झाल्याचे पत्र दिले तरीही ते ग्राह्य धरणार असल्याचे कांचनमाला संगवे यांनी सांगितले.

Web Title: Indian Jain Association to adopt orphaned children in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.