इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिनला अटक

By Admin | Published: April 26, 2016 04:14 PM2016-04-26T16:14:14+5:302016-04-26T17:44:41+5:30

झवेरी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिनला अटक करण्यात आली आहे

Indian Mujahideen operative Zainul Abedin arrested | इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिनला अटक

इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिनला अटक

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 26 - झवेरी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक झैनुल अबेदिनला अटक करण्यात आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन झैनुल अबेदिनला अटक करण्यात आली. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही अटकेची कारवाई केली. झैनुल अबेदिन महाराष्ट्र एटीएस, गुजरात पोलीस तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) वॉण्टेड लिस्टमध्ये होता. 
 
'झैनुल अबेदिन भटकळला भेटण्यासाठी भारतात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी तो मुंबईत येणार आहे याची खबर मिळताच सापळा रचून त्याला विमानतळावर अटक करण्यात आली', अशी माहिती एटीएस अधिका-याने दिली आहे. 
 
13 जुलै 2011 मध्ये झालेल्या झवेरी बाजार स्फोटात झैनुल अबेदिनचा सहभाग होता. तसंच देशभरातील इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना स्फोटके तसंच शस्त्रसाठा पुरवण्याचं काम झैनुल अबेदिन करत असल्याचा संशय आहे. अनेक राज्यातील तपासयंत्रणा झैनुल अबेदिनचा शोध घेत होत्या. महाराष्ट्र एटीएसने झैनुल अबेदिनविरोधात रेड कॉर्नर नोटीसदेखील काढली होती. 
 
 
दादरमधील कबुतरखाना, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या तीन ठिकाणी लगोपाठ साखळी स्फोट झाले होते. संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटं, 6 वाजून 55 मिनिटं आणि 7 वाजून 05 मिनिटांनी हे स्फोट झाले होते. या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर 130 जण जखमी झाले होते. पहिला स्फोट दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारातल्या खाऊ गल्लीत झाला. त्यानंतर दुसरा स्फोट ऑपेरा हाऊस येथे तर तिसरा स्फोट दादरमधील कबुतरखाना येथे झाला होता.
 

Web Title: Indian Mujahideen operative Zainul Abedin arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.