इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याला अटक

By admin | Published: April 27, 2016 06:21 AM2016-04-27T06:21:39+5:302016-04-27T06:21:39+5:30

२०११ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा जैनुल अबिदिन (२६) या अतिरेक्यास मंगळवारी पहाटे एटीएसने येथे विमानतळावर अटक केली.

Indian Mujahideen terrorist arrested | इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याला अटक

इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याला अटक

Next

मुंबई : मुंबईत २०११ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा जैनुल अबिदिन (२६) या अतिरेक्यास मंगळवारी पहाटे एटीएसने येथे विमानतळावर अटक केली. या तिहेरी बॉम्बस्फोटात त्याने स्फोटके वितरित केली होती. दरम्यान, न्यायालयाने त्यास ६ मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जैनुल अबिदिन हा २०११ नंतर फरार होता. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये त्याला कथितरीत्या सौदी अरेबियात ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जाते. मुंबईत २०११ मध्ये हे तीन भीषण बॉम्बस्फोट झाले होते. आॅपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर परिसरात सायंकाळी ६.५४ ते ७.०६ च्या दरम्यान स्फोट झाले होते. यात २७ जण ठार, तर १२० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला अबिदिन हा बारावा आरोपी आहे. यासीन भटकळला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, तर आणखी सात जण वाँटेड आहेत.
एटीएसचे आयजी (पोलीस महानिरीक्षक) निकेत कौशिक यांनी सांगितले की, अबिदिनविरुद्ध २०१५ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास त्यास मुंबईत विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून या पूर्ण कटकारस्थानाची माहिती उघड होऊ शकते. यासीन भटकळ आणि त्याचे साथीदार वकार व तबरेज यांनी बॉम्ब पेरले होते. दरम्यान, मंगलोरमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात अबिदिननेच आरडीएक्स पुरविले होते. गतवर्षी मार्चमध्ये बंगळुरूतून डॉ. सय्यद इस्माईल अफाक यास अटक करण्यात आली होती. स्फोटापूर्वी हा रियाज भटकळच्या संपर्कात होता. स्फोटके यासीनच्या एका सहकाऱ्याकडे (वकास) देण्याबाबत त्याने विचारणा केली होती. त्यानुसार अफाकने स्फोटके मिळविली आणि ती अबिदिनकडे दिली. त्याने ती वकासकडे देण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले. अबिदिन हा मूळचा कर्नाटकातील भटकळच्या गावचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाजनेच अबिदिनला इंडियन मुजाहिद्दीनमध्ये आणले होते. देशात इंडियन मुजाहिद्दीनकडून करण्यात आलेल्या बहुतांश स्फोटांत अबिदिन यानेच स्फोटकांचा पुरवठा केला होता.

Web Title: Indian Mujahideen terrorist arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.