रेल्वेकडेही पैशांची वानवा? कंत्राटी कामगारांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले; जेवणाचेही हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:40 PM2020-07-09T20:40:15+5:302020-07-09T20:41:47+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च अखेरीस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर दोन वेळचे जेवण जेवण्याचे हाल झालेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च अखेरीस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. सुमारे साडे तीन ते चार हजार कंत्राटी कर्मचारी रेल्वे मार्गावर स्वच्छतेचे व इतर कामे करत आहेत. मात्र यापैकी तीन हजार कर्मचारी पगाराविना आहेत. त्यांना मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत वेतन थकवल्याची माहिती रेल्वे कामगार संघटनेकडून देण्यात आली आहे.
सीएसएमटी, दादर, माझगाव, मुलुंड, ठाणे येथील कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. मागील तीन महिन्यापासून कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याना वेतन मिळाले नाही. त्याचे रोजच्या जेवणाची गैरसोय झाली आहे. अनेक कर्मचारी तक्रारी करत आहेत. मात्र त्यांना वेतन अद्याप देण्यात आले नाही, अशी माहिती सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे सरचिटणीस अमित भटनागर यांनी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
महाराष्ट्रासमोर आव्हान! कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली; दिवसभरात 219 बळी
मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार
कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट
भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार
परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार