Indian Railway: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! कमी प्रतिसादामुळे राज्यातील ‘या’ १० ट्रेन्स रद्द; पाहा यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:22 PM2021-04-26T23:22:49+5:302021-04-26T23:23:48+5:30
राज्यात वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलेले आहे.
मुंबई – देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३० एप्रिलपर्यंत अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नका असं वारंवार सांगितलं जात आहे. त्याचसोबत आंतरजिल्हा ई पासची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.
राज्यात वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलेले आहे. त्यामुळे राज्यात सुरु असणाऱ्या ट्रेन्स प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे आणि संख्या अत्यल्प असल्याने रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
खालील प्रत्येक ट्रेनच्या समोर दिलेल्या कालावधीत रद्द
१) 02109/02110 मुंबई -मनमाड- मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
२) 02015/02016 मुंबई - पुणे- मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
३) 02113 पुणे- नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत व
02114 नागपूर - पुणे त्रि-साप्ताहिक विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. ९.५.२०२१ पर्यंत
४) 02189 मुंबई- नागपूर विशेष २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत आणि 02190 नागपूर- मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
५) 02207 मुंबई - लातूर विशेष आठवड्यातील चार दिवस दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
02208 लातूर - मुंबई आठवड्यातील चार दिवस विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत
६) 02115 मुंबई - सोलापूर विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत आणि 02116 सोलापूर - मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
७) 01411 मुंबई- कोल्हापूर विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत आणि 01412 कोल्हापूर-मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
८) 02111 मुंबई-अमरावती विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत आणि 02112 अमरावती-मुंबई विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत
९) 02271 मुंबई-जालना विशेष दि. २७.४.२०२१ ते दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि 02272 जालना-मुंबई विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ११.५.२०२१ पर्यंत
१०) 02043 मुंबई-बिदर त्रि-साप्ताहिक विशेष दि. २८.४.२०२१ ते दि. ८.५.२०२१ पर्यंत आणि 02044 बिदर-मुंबई त्रि-साप्ताहिक विशेष दि. २९.४.२०२१ ते दि. ९.५.२०२१ पर्यंत.