पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट होणार - सुरेश प्रभू
By Admin | Published: July 16, 2017 05:47 PM2017-07-16T17:47:09+5:302017-07-16T17:47:09+5:30
येत्या पाच वर्षात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल असे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केले.
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 16 - भारतीय रेल्वे जगातील सर्वोत्तम रेल्वे बनविण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूदीद्वारेपायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे अर्थसंकल्प येत्या काही वर्षात २ लाख ७५ हजार कोटी रुपयांपर्यत वाढवून त्यानंतर रेल्वे क्षेत्राचा सर्व सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद ८ लाख ७० हजार कोटी रूपयांपर्यत वाढविण्यात येईल. या सर्वांमुळे येत्या पाच वर्षात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल असे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केले.
पिंपरी-चिंचवड, दि. 16 - भारतीय रेल्वे जगातील सर्वोत्तम रेल्वे बनविण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूदीद्वारेपायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे अर्थसंकल्प येत्या काही वर्षात २ लाख ७५ हजार कोटी रुपयांपर्यत वाढवून त्यानंतर रेल्वे क्षेत्राचा सर्व सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद ८ लाख ७० हजार कोटी रूपयांपर्यत वाढविण्यात येईल. या सर्वांमुळे येत्या पाच वर्षात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल असे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केले.
हिंजवडी आयटी पार्क येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझीनेस या संस्थेने रोप्यमहोत्सवी वर्षात प्रदार्पण केले त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हूनन ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, थायसेनकृप इंडियाचे उपाध्यक्ष दारा दमानिया, एसआयआयबीच्या संचालिका डॉ. अस्मिता चिटणीस आजी-माजी विद्यार्थी व प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते. या वेळी प्रभू यांच्या हस्ते एसआयआयबीच्या "अविस्मरणीय" या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रभू पुढे म्हणाले, जपान आणि चीनमध्ये ज्या पद्धतीने रेल्वेचा विकास सुरु आहे, त्या पद्धतीने देशात रेल्वेच्या विकासाला सुरूवात झाली असून मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता या रेल्वेमार्गांवर दोनशे किमी प्रतितास वेगाने प्रवासी रेल्वे चालिण्यासाठी प्रसत्न करण्यात येत आहे येत्या काळात प्रवाशांच्या समस्या व तक्रारी ‘रिअल टाइम’वर सोडविण्यावर अधिक भर दिला जाईल. " चीन आणि जपान या देशांनीपूर्वीपासून रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक करीत त्यांच्या अर्थसंकल्पात त्यांनी रेल्वेसाठी भरघोस तरतूद केली आहे. त्या तुलनेत आपण मागे आहोत. देशात ४० हजार रेल्वेडब्यांचे नूतनीकरण सुरु आहे. मीटरगेज रेल्वमार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर सुरू असून कालांतराने त्यांचे विद्युतीकरण करण्यात येईल. देशातील ४० ते ५० प्रमुख रेल्वेस्टेशन विमानतळासारखे करण्यावर भर दिला जाणार आहे. रेल्वेत ई-कॅटरिंग सर्व्हिसला प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मी नेहमी आतुर असतो असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
प्रभू यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदिया, संजय किर्लोस्कर, एस. के. जैन तसेच संस्थेच्या माजी संचालक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘ भारताला भ्रष्टाचार, गरिबी अशा विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासले असताना देशाला आधार कार्डाची नाही. तर, या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी देशात उत्तम दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या सुविधेची पुरविण्याची गरज आहे.’ डॉ. येरवडेकर यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या जडणघडणीचा आढावा घेत २५ वर्षाचे स्वप्न सत्यात उतरल्याचे सांगितले. मोठ्या हुद्यावर पोहचलेले माजी विद्यार्थी मुकेश कुमार, वेंकटेलसू. प यांनी मनोगंगात संस्थेचे रन व्यक्त केले. प्रसिद्ध कलाकार उस्ताद सुजात खान, पंडित रोणू मुजुमदार आणि पंडित अरविंद कुमार आझाद यांचा संगीत मेहफिलीच्या जुगलबंदीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.