एव्हरेस्टच्या माथ्यावर भारतीयांचा विक्रम; टिंकेश जगातील पहिला ट्रिपल अँप्युटी, १६ वर्षीय काम्या देशातील सर्वात युवा गिर्यारोहक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:35 PM2024-05-24T13:35:57+5:302024-05-24T13:36:56+5:30
गिर्यारोहणाचा अनुभव नसल्याने तब्येत बिघडली, पण स्वतःलाच आव्हान देत बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक पूर्ण केल्याचे टिंकेशने सांगितले.
पणजी/मुंबई : गोव्यातील ३० वर्षीय टिंकेश कौशिक हा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारा जगातील पहिला ट्रिपल अँप्युटी (दिव्यांग) व्यक्ती बनला आहे. ट्रिपल अँप्युटी असलेल्या टिंकेशला दोन्ही पाय व एक हात नाही. ११ मे रोजी त्याने १७,५९८ फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. टिंकेश ९ वर्षांचा असताना हरयाणात झालेल्या दुर्घटनेत त्याने गुडघ्याखालील दोन्ही पाय आणि एक हात गमावला होता.
गिर्यारोहणाचा अनुभव नसल्याने तब्येत बिघडली, पण स्वतःलाच आव्हान देत बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक पूर्ण केल्याचे टिंकेशने सांगितले.
१६ वर्षीय काम्या देशातील सर्वात युवा गिर्यारोहक -
मुंबईची काम्या कार्तिकेयनने अवघ्या १६ व्या वर्षी माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवत जगातील दुसरी व देशातील सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा पराक्रम केला. मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये बाराव्या वर्गात शिकणाऱ्या काम्याने २० मे रोजी एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवले. या मोहीमेत तिचे वडील एस. कार्तिकेयन यांनी मोलाची साथ दिली. काम्याचे वडील भारतीय नौदलात कमांडर आहेत.
अंटार्क्टिकातील माऊंट विन्सन सर केल्यावर ती ७-समीट चॅलेंज पूर्ण करणारी काम्या ही जगातील सर्वात तरुण मुलगी ठरणार आहे.