भारतीय युवक इसिसमध्ये
By admin | Published: April 24, 2015 01:02 AM2015-04-24T01:02:44+5:302015-04-24T01:02:44+5:30
इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरुण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे
डिप्पी वांकाणी, मुंबई
इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी कल्याणमधून इराकला गेलेल्यांपैकी एक तरुण इसिसमध्ये आत्मघातकी बॉम्ब बनला असावा असा संशय आहे. या माणसाची ओळख शोधण्यासाठी इतर सुरक्षा संघटनांचीही मदत घेण्याचा एनआयएचा विचार आहे.
टिष्ट्वटरवरील, मॅग्नेटगॅस १७ या हँडलवर उपलब्ध झालेल्या माहितीवरून हा संशय निर्माण झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) व आयबी या दोन्ही संघटनांच्या अधिकाऱ्यांचे या हँडलवर बारीक लक्ष आहे. कारण त्यावर २० एप्रिल रोजी अबू तौहीद अल हिंदी नावाने चेहरा झाकलेल्या माणसाचे छायाचित्र पडले होते. या माणसाच्या हातात एके-४७ रायफल होती व त्याने आपण खलिफाच्या भूमीत आहोत असे म्हटले होते. या व्यक्तीची रायफल आकाशाकडे रोखलेल्या स्थितीतील सहा छायाचित्रे टिष्ट्वटर हँडलवर पडलेली होती. एनआयएमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या छायाचित्राखाली दोन ओळींचा मजकूरही होता. या मजकुरात असे लिहिले होते की, अबू तौहीद अल हिंदी आता खलिफाच्या भूमीत आहे. भारतातून अगदी कमी लोक इसिसमध्ये सहभागी
झाले आहेत. आम्ही मरण्यास तयार आहोत.
गुप्तचर खात्यातील वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अल हिंदी हे नाव इसिसमध्ये जाणाऱ्या भारतीय युवकांना देण्यात आले असावे. खलिफाच्या भूमीत म्हणजेच इसिसचा प्रमुख नेता अबू बक्र अल बगदादी याच्या जवळपास ते राहत असावेत. म्हणजेच त्यांनी प्रशिक्षणाचे अत्याधुनिक ज्ञान प्राप्त केले असावे. आत्मघातकी बॉम्ब बनेपर्यंत
ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते, तेच ‘खलिफाच्या भूमीत’ असा शब्दप्रयोग करतात.