भारतीयांना नोकरीची भीती नाही

By admin | Published: November 10, 2016 02:19 AM2016-11-10T02:19:44+5:302016-11-10T02:19:44+5:30

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. त्यामुळे एका उद्योगपतीची निवड राष्ट्राध्यक्षपदावर होणे योग्य होईल का?

Indians are not afraid of job | भारतीयांना नोकरीची भीती नाही

भारतीयांना नोकरीची भीती नाही

Next

पुणे : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. त्यामुळे एका उद्योगपतीची निवड राष्ट्राध्यक्षपदावर होणे योग्य होईल का? उथळ राष्ट्रवादाच्या संकल्पनेला चालना देणारे सत्तेत आल्याने काय होईल? भारताच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प की हिलरी क्लिंटन सोईचे आहेत, अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या विजयावर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला चांगलाच रंग आला होता. भारतातील अनेक तरुण व नागरिक अमेरिकेत नोकरीसाठी गेले आहेत. तर काही नागरिक तेथेच स्थायिक झाले आहेत.
त्यामुळे भारतीयांसाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार सोईचा असेल,
यावर तर्कवितर्क काढले जात
होते.
माजी राष्ट्राध्यक्ष हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारासाठी उतरलेले होते. तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्रम्प नेहमीच चर्चेत राहिले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या आक्रमकतेच्या बाजूने कौल मिळणार की सर्वसमावेश भूमिका घेऊन उतरलेल्या क्लिंटन यांना हार पत्करावी लागणार, असे आडाखे बांधले जात होते. अखेर ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिला गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Indians are not afraid of job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.