भारताच्या वृद्धीदराला दुष्काळाचा धोका

By Admin | Published: June 27, 2014 11:59 PM2014-06-27T23:59:00+5:302014-06-27T23:59:00+5:30

आर्थिक वृद्धीदर 5 टक्क्यांच्या खाली जाईल, असा इशारा बँक ऑफ अमेरिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने म्हणजेच मेरिल लिंचने दिला आहे.

India's aged drought threatens drought | भारताच्या वृद्धीदराला दुष्काळाचा धोका

भारताच्या वृद्धीदराला दुष्काळाचा धोका

googlenewsNext
>नवी दिल्ली : दुष्काळामुळे भारताचा आर्थिक वृद्धीदर 5 टक्क्यांच्या खाली जाईल, असा इशारा बँक ऑफ अमेरिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने म्हणजेच मेरिल लिंचने दिला आहे. याचा परिणाम म्हणजे महागाईचा दर 8 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान राहील आणि रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर टाकावा लागेल, असेही या संस्थेने म्हटले आहे.
देशात मान्सून लांबला आहे. सध्या झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा 45 टक्क्यांनी कमी आहे, असे डीएसपी मेरिल लिंचचे अर्थशास्त्रज्ञ इंद्रानी सेनगुप्ता यांनी सांगितले.
एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून, यामुळे 2015 या वर्षासाठी असलेला विकास दराचा 5.4 टक्क्यांचा अंदाज प्रत्यक्षात अर्धा ते पाऊण टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 
या परिस्थितीत महागाईही 8 ते 10 टक्क्यांच्या दरम्यानच राहील. त्यामुळेही रिझव्र्ह बँकेवर व्याजदर घटविण्यास मर्यादा येतील, असे त्यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4पावसाचे प्रमाण घटल्याने तीन त:हेचा फटका बसू शकतो, असेही ते म्हणाले. पहिला परिणाम म्हणजे दुष्काळामुळे खरीप पीक संकटात येईल. जर खरीप पिकात 3 टक्के घट झाली, तर आर्थिक वृद्धीदरात पाव टक्क्याने घट होते. 
4दुसरा परिणाम होईल, तो कृषी क्षेत्रवर. या क्षेत्रचा विकासदर कमी होईल. 
 
4तिसरा फटका बसेल, तो औद्योगिक उत्पादनाला. रिझव्र्ह बँक या परिस्थितीत व्याजदर घटविण्याची शक्यता नसल्याने त्याचा औद्योगिक क्षेत्रला फटका बसेल, असे विश्लेषण सेनगुप्ता यांनी केले आहे.

Web Title: India's aged drought threatens drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.