भारताची भूमिका जगासमोर आली - जावडेकर
By admin | Published: January 4, 2016 03:11 AM2016-01-04T03:11:36+5:302016-01-04T03:11:36+5:30
जागतिक तापमानवाढीला विकसित देशच जास्त कारणीभूत आहेत, ही भूमिका ठोसपणे मांडून ती सिद्ध करण्यात जागतिक पर्यावरण परिषदेत भारताला यश आले आहे
पुणे : जागतिक तापमानवाढीला विकसित देशच जास्त कारणीभूत आहेत, ही भूमिका ठोसपणे मांडून ती सिद्ध करण्यात जागतिक पर्यावरण परिषदेत भारताला यश आले आहे. विकसित देशांकडून विकसनशील देशांना लक्ष्य केले जात होते. विकसित देशांना आपण प्रथमच खडसावले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी येथे केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण अणि भारताची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जावडेकर बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर, डॉ. विजय केळकर हे यावेळी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘भारताकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जात होते. या परिषदेनंतर जगाचा दृष्टिकोन बदलला आहे़’ अमेरिका, इंग्लंडसारखे भौतिक विकास करणारे देश हे जागतिक तापमान वाढीसाठी जास्त कारणीभूत आहेत. प्रदूषणाचा दरडोई विचार करता, विकसित देशांकडूनच अधिक प्रदूषण होते, हे भारताने सांगितले. (प्रतिनिधी)