देशी कापूस शेतक-यांना ठरणार वरदान!

By Admin | Published: November 13, 2015 02:09 AM2015-11-13T02:09:10+5:302015-11-13T02:09:10+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन प्रक्षेत्रावर देशी कापसाची लागवड करण्यात आली आहे.

Indigenous cotton farmers will be boon! | देशी कापूस शेतक-यांना ठरणार वरदान!

देशी कापूस शेतक-यांना ठरणार वरदान!

googlenewsNext

राजरत्न सिरसाट/अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन प्रक्षेत्रावर देशी कापसाची लागवड करण्यात आली आहे. राज्य, विदर्भातील शेतकर्‍यांनी या कापसाचे प्रात्यक्षिक बघून, पेरा वाढवावा, हा या मागील कृषी विद्यापीठाचा उद्देश आहे. देशात सर्वत्र बीटी कपाशीचे क्षेत्र वाढले असून, देशी कापूस नाममात्र उरला आहे. या बीटीला तोंड देण्यासाठी या कृषी विद्यापीठाने अनेक नवे कापसाचे वाण निर्माण केले आहेत. पावसाचा ताण सहन करणारे व कमी दिवसांत येणार्‍या कापसाच्या वाणांचा यामध्ये समावेश आहे. कृषी विद्यापीठाचे 0८१ वाण, तर शेतकर्‍यांना वरदान ठरणारे आहे. कृषी विद्यापीठाचे देशी बीटी कापसाचे संशोधनही अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी पाऊस कमी व उशिरा आल्याने कृषी विद्यापीठाने कापूस पिकात आंतरपिकाचा प्रयोग केला आहे. हा यावर्षी प्रयोग केला असला तरी कृषी विद्यापीठाचे उद्दिष्ट देशी कापसावर आहे. त्यासाठी अतिघनता कापूस उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अतिघनता लागवड पद्धतीने देशी कापसाची पेरणी केल्यास बीटी कापसाच्या बरोबरीने उत्पादन मिळते. शिवाय कापूस काढल्यानंतर या क्षेत्रावर दुबार म्हणजेच रब्बी पीक घेता येत असल्याचे प्रयोग या प्रक्षेत्रावर करण्यात आले आहेत. येत्या २७ ते २९ डिसेंबर रोजी कृषी विद्यापीठाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस, डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती-पुण्यतिथीला शेतकरी कृषी विद्यापीठाचे पीक प्रात्यक्षिक बघण्यासाठी या प्रक्षेत्राला भेटी देत असतात. या प्रक्षेत्रावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी कापूस वाणांचा समावेश आहे. देशी कापसाचा पेरा वाढावा, हा यामागे उद्देश असून, बरेच शेतकरी देशी कापसाची पेरणी करीत आहेत. यासोबत ४८६ या प्रख्यात कापूस वाणावर संकर करू न नवे देशी बीटी वाण विकसित करण्यात आले आहे.

Web Title: Indigenous cotton farmers will be boon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.