इंदोरीकरांकडे राजकीय नेत्यांची रीघ; मनसे, भाजपचे नेते भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:02 AM2020-07-13T02:02:19+5:302020-07-13T02:02:53+5:30
कीर्तनामधून इंदोरीकर महाराज यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीएनडीटी) कायद्याचा भंग केल्याची न्यायालयात खासगी फिर्यादही दाखल झाली आहे.
अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाल्यानंतर आता त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत राजकीय नेते इंदोरीकरांच्या भेटी घेत आहेत. दोन दिवसात मनसे व भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या ओझर (ता. संगमनेर) येथील निवासस्थानी येत त्यांना पाठिंबा दिला.
कीर्तनामधून इंदोरीकर महाराज यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीएनडीटी) कायद्याचा भंग केल्याची न्यायालयात खासगी फिर्यादही दाखल झाली आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी शनिवारी इंदोरीकरांची भेट घेतली. रविवारी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा वारकरी संप्रदाय क्षेत्रातील आचार्य तुषार भोसले यांनी इंदोरीकर यांची भेट घेतली. शिवसेनेचे हिंदुत्व आता कुठे दिसते आहे? असा प्रश्न त्यांनी केला.