अशक्तपणामुळे इंद्राणी बेशुद्ध
By admin | Published: October 11, 2015 01:28 AM2015-10-11T01:28:43+5:302015-10-11T01:28:43+5:30
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या बेशुद्ध होण्याबाबत अनेक शक्यता वर्तविल्या जात असल्यातरी तुरुंग प्रशासनाने मात्र अशक्तपणामुळे ती बेशुद्ध झाल्याचा दावा केला आहे.
मुंबई: शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या बेशुद्ध होण्याबाबत अनेक शक्यता वर्तविल्या जात असल्यातरी तुरुंग प्रशासनाने मात्र अशक्तपणामुळे ती बेशुद्ध झाल्याचा दावा केला आहे.
७ सप्टेंबर पासून न्यायालयीन कोठडीत असलेली आरोपी इंद्राणी मुखर्जी २ आॅक्टोबर रोजी कोठडीत बेशुद्ध पडली होती. कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक बिपीन कुमार सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून याबाबत केलेल्या तपासाची माहिती दिली. याप्रकरणी एकुण ३२ जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, ‘न्यायालयीन कोठडीत असल्यापासून इंद्राणी दोन ते तीन वेळा चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर जेजेच्या डॉक्टरांकडून तिची तपासणी करण्यात आली. त्यानंतर झोप येत नाही, अंग दुखते, अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी समोर आल्याने मानसोपचारत्जज्ञांची मदत घेण्यात आली होती. यानंतर इंद्राणीला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सारीका दिक्षिकर यांच्या देखरेखेखाली औषधोपचार सुरु होते. १२ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आलेली ही औषधे डाक्टरांच्या सल्ल्यानुसार २६ तारखेला बंद करण्यात आली होती.
कोकेनचे प्रमाण साधारण
इंद्राणीच्या तपासणीत ३५ नॅनो ग्रॅम कोकेन आढळले होते. मात्र प्रत्येक मनुष्याच्या शरीरात सर्वसाधारणपणे शुन्य ते ३०० नॅनो ग्रॅमपर्यंत कोकेन असते, त्याहून अधिक प्रमाण असल्यास ते धोकादायक असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांचे मत आहे. इंद्राणीच्या शरीरामध्ये आढळलेल्या कोकेनच्या मात्रेचे प्रमाण खुपच कमी आहे.