शीना बोरा खून प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण

By admin | Published: October 28, 2015 04:50 PM2015-10-28T16:50:06+5:302015-10-28T17:05:27+5:30

बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंगूची लागण झाली आहे. भायखळा येथील महिला तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला

Indrani Mukherjee accused in Sheena Bora murder case: Dengue infection | शीना बोरा खून प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण

शीना बोरा खून प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण झाली आहे. 
भायखळा येथील महिला तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण झाल्याची शक्यता आहे. तिच्या रक्तातील प्लेटलेट्स सुदधा कमी झाल्या आहेत. जे.जे रुग्णालयातील डॉक्टर इंद्राणी मुखर्जीच्या तपासणीसाठी तुरुंगात आले होते. त्यानंतर तिच्या पुढील उपचारासाठी तिला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आहे. याबाबतची माहिती न्यायालयाला कऴविण्यात आली असल्याचे भायखळा महिला तुरुंग प्रशासनाने सांगितले. 
तीन वर्षांपूर्वी शीना बोरा हिचा खून झाला होता. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसह तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम रॉय गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Web Title: Indrani Mukherjee accused in Sheena Bora murder case: Dengue infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.