इंद्राणी मुखर्जींना गोळ्यांचा ओव्हरडोस नाही ?
By admin | Published: October 3, 2015 06:12 PM2015-10-03T18:12:50+5:302015-10-03T18:16:43+5:30
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला असून इंद्राणींनी गोळ्यांचे अतिसेवन केले नव्हते अशी माहिती या रिपोर्टमधून निष्पन्न झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला असून इंद्राणींनी गोळ्यांचे अतिसेवन केले नव्हते अशी माहिती या रिपोर्टमधून निष्पन्न झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी एक नवीन वळण मिळाले आहे.
इंद्राणी मुखर्जी यांना शुक्रवारी मानसिक तणावावरील गोळ्यांचा प्रमाणापेक्षा अधिक डोस घेतल्याने मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी पुढील ७२ तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. इंद्राणी यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट शनिवारी संध्याकाली समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्राणी यांच्या रक्त व लघवीत औषधाचा अंश आढळला नाही असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे इंद्राणींनी औषधांचे अतिसेवन केलेच नव्हते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.