इंद्राणी, रायवर आरोपपत्र

By Admin | Published: November 20, 2015 03:59 AM2015-11-20T03:59:59+5:302015-11-20T03:59:59+5:30

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयने शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यावर गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

Indrani, Raiver charge sheet | इंद्राणी, रायवर आरोपपत्र

इंद्राणी, रायवर आरोपपत्र

googlenewsNext

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयने शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यावर गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, शीनाची हत्या करण्यामागे या तिघांचा हेतू काय होता? याचा शोध लावण्यास सीबीआयला अद्याप यश मिळालेले नाही.
२४वर्षीय शीनाची हत्या
तिची आई इंद्राणी आणि तिचा
दुसरा पती संजीव खन्ना आणि
ड्रायव्हर श्यामवर राय यांनी
केल्याचा आरोप आहे. एप्रिल २०१२मध्ये शीनाची हत्या करून पेणच्या गागोदे गावाजवळील जंगलात
तिचा मृतदेह असलेली बॅग जाळण्यात आली होती.
या तिघांवर दाखल करण्यात आलेले आरोपपत्र एक हजार पानांचे आहे, तर १५० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. साक्षीदारांमध्ये पीटर मुखर्जी यांचा मुलगा व शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी याचाही जबाब नोंदविण्यात आला आहे, हे वाक्य टाकण्यात
आले आहे, तसेच ७ लोकांच्या सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत दिलेल्या जबानीदेखील आरोपपत्राला जोडण्यात आल्या आहेत, तसेच डीएनए टेस्ट, कॉल डाटा रेकॉर्ड, एम्सने दिलेला वैद्यकीय अहवाल आणि शीनाची हत्या करण्यात आल्यानंतर इंद्राणीने तिच्या एका कर्मचाऱ्याला शीनाच्या नावे पाठवण्यास सांगितलेल्या ई-मेलच्या कॉपीची प्रतही आरोपपत्रांना जोडण्यात आली आहे.
तिघांवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सीबीआयने सुमारे २०० पुरावे आरोपपत्राला जोडले आहेत, परंतु या हत्येमागे तिघांचाही हेतू काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, हेसुद्धा सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.
इंद्राणी, खन्ना आणि राय यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, पुरावे नष्ट करणे इत्यादी आरोप ठेवण्यात आले आहेत, तर आयटी अ‍ॅक्टअंतर्गतही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे होता. मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणाचा तपास स्वत: लक्ष घालून केला होता. मात्र, या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका सरकारला आल्याने, हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. इंद्राणी, खन्ना आणि राय हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून, शुक्रवारी त्यांची न्यायालयीन कोठडी संपत आहे.

इंद्राणी आणि खन्ना बराच वेळ फोनवर बोलत होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी खन्ना मुंबईत आला आणि हॉटेलमध्ये मुक्काम केला. संध्याकाळी ७ वाजता इंद्राणी आणि खन्ना शीनाला आणण्यासाठी वांद्रे येथे गेले, असे राय याने कबुलीजबाबात म्हटले आहे.
शीनाला रायगडला नेणे, ते तिची फास लावून हत्या करण्यापर्यंतच्या घडामोडी राय नीट देऊ शकलेला नाही. खन्नानेच शीनाच्या गळ्याला फास लावला आणि इंद्राणीच्या मदतीने शीनाचा मृतदेह बॅगमध्ये भरला. कारच्या डिक्कीत शीनाचा मृतदेह ठेवण्यात आला. त्यानंतर गागोदेच्या जंगलात त्या बॅगवर पेट्रोल टाकून बॅग पूर्ण जळेपर्यंत इंद्राणी व खन्ना तेथेच उभे होते, असेही रायने कबुली जबाबात म्हटले आहे.

श्याम राय बनणार माफीचा साक्षीदार?
इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने गेल्याच आठवड्यात गुन्ह्यांची कबुली दंडाधिकाऱ्यांना दिली. त्याच्या कबुलीजबाबामुळे इंद्राणी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना अडचणीत आला आहे.
राय याने कबुलीजबाब दिल्याने सीबीआय त्याला या केसमध्ये ‘माफीचा साक्षीदार’ करू शकते. मात्र, अद्याप तरी सीबीआयने याबाबत निर्णय घेतला नसल्याचे, दिल्लीच्या एका सीबीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विशेष सीबीआय न्यायालय यावर निर्णय घेऊ शकेल, असेही सूत्रांनी सांगितले.
शीना बोराच्या हत्येचा कट इंद्राणी मुखर्जीने रचला, तर तिचा दुसरा पती संजीव खन्ना याने तो कट अंमलात आणला, असे रायने दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.
रायने गेल्याच आठवड्यात दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून, आपल्याला या केसची खरी माहिती द्यायची असल्याचे सांगितले. २७ आॅक्टोबर रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने त्याचा कबुलीजबाब नोंदवण्यास नकार दिला. मात्र, ८ नोव्हेंबर रोजी त्याचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला. सीबीआयने हा कबुलीजबाब आरोपपत्राला जोडला आहे.
राय ७.६५ एमएम पिस्तूल घेऊन निघाल्याची माहिती पोलिसांच्या खबरीने दिल्याने, खार पोलिसांना त्याला अटक केली. या केसमध्ये त्याची चौकशी करत असताना, रायने शीना बोरा हत्येचे गुपित पोलिसांपुढे फोेडले.
रायने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबानुसार, इंद्राणीने २३ एप्र्रिल २०१२ रोजी म्हणजेच, शीनाची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी पेणजवळील गागोदे गावाची रेकी करण्यास पाठवल्याचे सांगितले.

Web Title: Indrani, Raiver charge sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.