इंद्राणीची प्रकृती जैसे थे
By admin | Published: October 6, 2015 02:57 AM2015-10-06T02:57:47+5:302015-10-06T02:57:47+5:30
रविवारी सकाळी शुद्धीवर आलेल्या इंद्राणी मुखर्जीची सोमवारी प्रकृती जैसे थे होती. तिची प्रकृती स्थिर असून तिला उठवून बसवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
मुंबई : रविवारी सकाळी शुद्धीवर आलेल्या इंद्राणी मुखर्जीची सोमवारी प्रकृती जैसे थे होती. तिची प्रकृती स्थिर असून तिला उठवून बसवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
इंद्राणीला शुक्रवारी दुपारी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तिने जास्त गोळ्या घेतल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तिच्यावर उपचार सुरू केले. शनिवारी इंद्राणीने उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. रविवारी ती शुद्धीवर आली. त्यानंतर तिच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारचे चढ-उतार झालेले नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून ती शुद्धीवर आहे. इंद्राणीच्या प्रकृतीचा धोका टळला असून, अजून एक ते दोन दिवस तिला देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. फिजिशियन आणि मानसोपचारतज्ज्ञ इंद्राणीला डिस्चार्ज कधी द्यायचा याचा निर्णय घेणार आहेत. अद्याप हा निर्णय झालेला नाही. मात्र दोन दिवसांत इंद्राणीची प्रकृती स्थिर राहिल्यास तिला डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)