Indurikar Maharaj Vs Gautami Patil: “गौतमी पाटीलच्या ३ गाण्याला ३ लाख,आम्ही ५ हजार मागितले तर पैशांचा बाजार”: इंदुरीकर महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:25 AM2023-03-26T10:25:26+5:302023-03-26T10:27:33+5:30

Indurikar Maharaj Vs Gautami Patil: गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध केला असून, यात आता कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडल्याचे सांगितले जात आहे.

indurikar maharaj kirtankar criticised gautami patil in beed ashti taluka kirtan | Indurikar Maharaj Vs Gautami Patil: “गौतमी पाटीलच्या ३ गाण्याला ३ लाख,आम्ही ५ हजार मागितले तर पैशांचा बाजार”: इंदुरीकर महाराज

Indurikar Maharaj Vs Gautami Patil: “गौतमी पाटीलच्या ३ गाण्याला ३ लाख,आम्ही ५ हजार मागितले तर पैशांचा बाजार”: इंदुरीकर महाराज

googlenewsNext

Indurikar Maharaj Vs Gautami Patil: गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची चर्चा राज्यभरात सुरू आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. तसेच छुप्या पद्धतीने तिचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. मात्र, यातच आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलसंदर्भात विधान केले आहे. 

आष्टी तालुक्यात एके ठिकाणी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचे उदाहरण दिले. गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध केला आहे. आता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची भर पडली आहे. इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. गौतमी पाटीलचे उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर इंदुरीकर महाराजांनी लक्ष वेधले आणि टीकाही केली. 

गौतमी पाटीलच्या ३ गाण्याला ३ लाख,आम्ही ५ हजार मागितले तर पैशांचा बाजार

गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर  तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणही दिले जात नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त केली. दुसरीकडे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी गौतमी पाटीलचा डान्स ठेवल्याचे समोर आले होते. तसेच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. कलावंत पोट भरण्यासाठी धडपडतो. पोटासाठी प्रत्येकजण काहीतरी करतो. मात्र जे करायचे आहे, ते चांगले करावे. गौतमी पाटील हिची लावणी नसून डीजे डान्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा हे जणू समीकरण बनले आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवले जाते. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: indurikar maharaj kirtankar criticised gautami patil in beed ashti taluka kirtan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.