Coronavirus: “दारूच्या दुकानांसह सर्व काही सुरु, फक्त देवाची मंदिरे बंद याचं वाईट वाटतं”: इंदुरीकर महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:19 PM2021-07-13T21:19:45+5:302021-07-13T21:20:57+5:30

Coronavirus: संभाजी भिडे गुरूजी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता प्रसिद्ध प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांनी खंत व्यक्त केली आहे.

indurikar maharaj says liquor shops open but temples are closed in corona situation | Coronavirus: “दारूच्या दुकानांसह सर्व काही सुरु, फक्त देवाची मंदिरे बंद याचं वाईट वाटतं”: इंदुरीकर महाराज

Coronavirus: “दारूच्या दुकानांसह सर्व काही सुरु, फक्त देवाची मंदिरे बंद याचं वाईट वाटतं”: इंदुरीकर महाराज

googlenewsNext

नगर: गतवर्षापासून देशात कोरोना संसर्गाने शिरकाव केल्यानंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्यातील लॉकडाऊनमुळे देशवासीयांना मोठ्या त्रासाला, समस्यांना आताच्या घडीलाही सामोरे जावे लागत आहे. राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत असले, तरी मंदिरे, धार्मिक स्थळे अद्याप बंदच आहे. यावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता प्रसिद्ध प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांनी खंत व्यक्त केली आहे. दारूच्या दुकानांसह सर्व काही सुरु, फक्त देवाची मंदिरे बंद याचे वाईट वाटते, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. (indurikar maharaj says liquor shops open but temples are closed in corona situation)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधाच्या कारणावरून लग्न, इतर कार्यक्रम आणि दारूची दुकानेही सुरू असताना राज्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आल्याबद्दल समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांनी नाराजी व्यक्त केली. कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार आणि खुनाच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल गावात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला

मंदिरे आणि प्रार्थना बंद असल्याचे वाईट वाटते

कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या महामारीमध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तरीही यामधूनही शहाणपण कोणाला आल्याचे दिसून येत नाही. आजही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना गर्दी करत आहेत. हा मोठा धोका आहे. दोन लाटा येऊन गेल्या, तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे समाजामध्ये दारूपासून सर्व काही सुरू आहे. परंतु फक्त देवाची प्रार्थना आणि मंदिरे बंद आहेत, याचे वाईट वाटते, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. 

ब्लड कॅन्सरचा दुर्मिळ आजार; मुंबईतील २९ वर्षीय तरुणाला स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज

दरम्यान, महाराष्ट्रात भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे कोरोना वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही. लॉकडाऊन हा सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. इतक्यावरच न थांबता वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत, असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: indurikar maharaj says liquor shops open but temples are closed in corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.