पाणीटंचाईच्या चुकीच्या संदेशामुळे मराठवाड्याचे औद्योगिक नुकसान
By admin | Published: May 14, 2016 02:20 AM2016-05-14T02:20:00+5:302016-05-14T02:20:00+5:30
मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईसंबंधी राज्य तसेच केंद्र सरकारने दिलेल्या चुकीच्या संदेशांमुळे मराठवाड्याचे भविष्यकाळात मोठे औद्योगिक नुकसान होणार आहे
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईसंबंधी राज्य तसेच केंद्र सरकारने दिलेल्या चुकीच्या संदेशांमुळे मराठवाड्याचे भविष्यकाळात मोठे औद्योगिक नुकसान होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
लातूरला रेल्वेने पाणी आणल्याचा प्रकार तसेच मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रातील पाण्याची कपात यामुळे मराठवाड्याची देशभरात चुकीची जाहिरात झाली आहे. पाणी नसेल तर कोणता उद्योग येथे येईल. राज्य सरकारने पाण्यासंबंधी मराठवाड्याची नकारात्मक प्रतिमा तयार केली आहे. ल्मराठवाड्यातील तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या पाणी कपातीला आपला विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
काही लोकांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे गुंतवणूक केली आणि आता तुम्ही पाणी कपात करून औद्योगिक क्षेत्राला काय संदेश देणार आहात. बाटलीबंद पाण्याला आणि शीतपेयांची पाणी कपात करणार आहात काय? पाणी कपात करावयाचीच असेल तर त्यासंबंधीचे धोरण ठरवायला हवे, असे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)