उद्योगांनी दाखविला महाराष्ट्रावर विश्वास, पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:36 AM2023-01-19T11:36:25+5:302023-01-19T11:37:21+5:30
दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: ‘‘कन्झर्व्हेशन, कनेक्टिव्हिटी, क्लीन सिटीज या तत्त्वांना अनुसरून पर्यावरणपूरक विकास करणे, यादृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल असेल,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील एका चर्चासत्रात बोलताना स्पष्ट केले.
बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावरील चर्चेत मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘‘आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी पवन आणि सौरऊर्जेला प्रोत्साहन, वन आच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर आमचा भर आहे. शाश्वत विकास हवा असेल तर सार्वजनिक-खासगी भागीदारी गरजेची आहे आणि महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे.’’
दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्यासाठी किती कोटींचे सामंजस्य करार करणार, याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानुसार आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मागील वर्षापेक्षा चारपट अधिक सामंजस्य करार करण्यात आले. झालेले करार प्रत्यक्षात येतील, असेही सामंत म्हणाले.
असे झाले सामंजस्य करार....