कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्यावर मोक्का लावणार
By admin | Published: August 9, 2014 11:13 PM2014-08-09T23:13:49+5:302014-08-09T23:13:49+5:30
अत्यंत निर्दयी आणि अल्पवयातच पुणो आणि नगर जिल्ह्यांत दरोडे टाकणारा कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळेवर मोक्का लावण्याचा विचार सुरू आह़े
Next
>नारायणगाव : अत्यंत निर्दयी आणि अल्पवयातच पुणो आणि नगर जिल्ह्यांत दरोडे टाकणारा कुख्यात दरोडेखोर बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळेवर मोक्का लावण्याचा विचार सुरू आह़े
दरोडेखोर काळे हा पकडला गेला नसता तर पुणो व नगर जिल्ह्यांत दरोडे टाकून त्याने धुमाकूळ घातला असता आणि अनेकांना प्राण गमवावे लागले असते अशी माहिती पुणो ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार तसेच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली़ बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळे (रा़ कोळगाव, ता़ श्रीगोंदा, जि.नगर) याला पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या पथकाने सापळा रचून भोसरी येथील एमआयडीसीमध्ये अटक केली होती़ नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कोतवाडी आणि पुण्यातील शिक्रापूर या तीनही ठिकाणांवरील दरोडय़ात बाब्या डबक याने खून केलेले आहेत़ बाब्या डबक हा दरोडे टाकल्यानंतर वेशभूषा बदलून नातेवाइकांकडे राहत अस़े तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा ठावठिकाणचा पोलिसांना समजून येत नव्हता़ पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर बाब्या ऊर्फ डबक काळे हा भोसरी येथे एका नातेवाइकाकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली़ त्यानंतर पोलिसांनी भोसरी येथे सापळा रचून त्यास अटक केली़
बाब्या काळे ऊर्फ डबक काळे व त्याचे साथीदार कोळगाव येथील डोंगररांगेमध्ये जंगलात राहत असत व दरोडे टाकण्यासाठी रात्रीच्या वेळेस जंगलातून बाहेर पडत असत.़ दरोडे टाकल्यानंतर पळून जाण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरून व मोटारसायकल कोणी ओळखू नये म्हणून ती नदी, धरण, विहिरीमध्ये टाकून देत व पुन्हा डोंगरामध्ये झाडीत जाऊन राहत, अशी माहिती त्यांनी तपासात दिली़(वार्ताहर)
लहान वयातच सराईत गुन्हेगार
बाब्या ऊर्फ डबक काळे हा लहान वयातच दरोडे टाकण्यात सराईत झाला होता़ त्याची शरीरयष्टी अत्यंत सडपातळ आहे, कोणीही पाहिल्यास तो सराईत आणि निर्दयी दरोडेखोर आहे असे कोणासही वाटणार नाही़ ज्या ठिकाणी दरोडे टाकण्यासाठी तो जातो तिथे दरवाजा दगडाने फोडून आतमध्ये प्रवेश करत अस़े घरातील कोणी जागा झाला किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर बाब्या डबक हा त्या व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून त्याचा खून करीत अस़े बाब्या डबकने बेळवंडी येथील दरोडय़ात दोन जणांचा खून केला आह़े