आमदार, खासदारांची प्रभागात घुसखोरी

By admin | Published: July 11, 2017 02:38 AM2017-07-11T02:38:12+5:302017-07-11T02:38:12+5:30

नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात आमदार आणि खासदारांनी परस्पर कार्यक्रम आणि योजना राबविण्याच्या मुद्द्यावरून दहिसरमध्ये शिवसेना आणि भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे

Infiltration of MPs and MLAs | आमदार, खासदारांची प्रभागात घुसखोरी

आमदार, खासदारांची प्रभागात घुसखोरी

Next

मनोहर कुंभेजकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात आमदार आणि खासदारांनी परस्पर कार्यक्रम आणि योजना राबविण्याच्या मुद्द्यावरून दहिसरमध्ये शिवसेना आणि भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. महापालिकेच्या आर मध्य आणि आर-उत्तरच्या प्रभागात समिती अध्यक्ष आणि वॉर्ड क्रमांक ७मधील शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आपल्या प्रभागात भाजपा आमदार व खासदार परस्पर कार्यक्रम ठरवित आहेत. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता महापालिका अधिकाऱ्यांसोबत कार्यक्रम ठरविले जात असल्याबद्दल तक्रार केली आहे. आमदार, खासदारांची ही घुसखोरी राजशिष्टाचाराला धरून नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.
आमदार व खासदारांकडून प्रभागातील कामांमध्ये होणाऱ्या घुसखोरीचा तीव्र निषेध करत म्हात्रे यांनी राजशिष्टाचाराचाच मुद्दा उपस्थित केला आहे. आमदार, खासदारांना पालिकेचीच कामे करायची असतील तर नगरसेवकांचा उपयोग काय, असा सवाल करतानाच हा मुद्दा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करणार असल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. शिवाय, स्थानिक नगरसेवकांना कल्पना दिल्याशिवाय सहायक आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रभागात आमदार, खासदारांसोबत जाऊ नये, असे आवाहनही म्हात्रे यांनी आर-उत्तरच्या सहायक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांना केले आहे.
>कलगीतुरा रंगला
जर आमदार, खासदार प्रभागात भेटी देणार असतील तर स्थानिक नगरसेवकाला याची पूर्वकल्पना दिली गेली पाहिजे. परस्पर कार्यक्रम घेणे राजशिष्टाचाराला धरून नाही. प्रभाग समितीच्या बैठकीतही पालिकेचे अधिकारी आमदार, खासदारांसाठी पायघड्या घालत असतात. परंतु नगरसेवकांची कामे वेळेवर केली जात नाहीत. याबाबत सर्वच नगरसेवकांनी आपला संताप व्यक्त केल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
दहिसरच्या भाजपा आमदार मनीषा चौधरी या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये घुसखोरी करतात, दहिसर नदीचा विकास करण्याच्या मुद्द्यावरून आमदार चौधरी आणि प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यात कलगीतुरा रंगल्याची चर्चा विभागात पाहायला मिळते.

Web Title: Infiltration of MPs and MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.