ऐन थंडीत महागाईचे चटके! ८ दिवसांत फ्लॉवरचे दर दुप्पट, शेवगा शेंगेसह मिरचीही कडाडली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:12 AM2023-01-17T07:12:19+5:302023-01-17T07:12:37+5:30

आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यापूर्वी फ्लॉवर ६ ते ८ रुपये किलो दराने विकला जात होता.

Inflation hits in the cold! In 8 days the rate of flower doubles, Chili also sevga rate increase | ऐन थंडीत महागाईचे चटके! ८ दिवसांत फ्लॉवरचे दर दुप्पट, शेवगा शेंगेसह मिरचीही कडाडली

ऐन थंडीत महागाईचे चटके! ८ दिवसांत फ्लॉवरचे दर दुप्पट, शेवगा शेंगेसह मिरचीही कडाडली

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घडली आहे. यामुळे ऐन थंडीमध्ये बाजारभाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये आठ दिवसांमध्ये फ्लॉवरचे दर दुप्पट वाढले असून शेवगा, शेंग, हिरवी मिरचीचे दरही कडाडले आहेत. 
बाजार समितीमध्ये हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती.  रोज ३ हजार टनपेक्षा जास्त आवक होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले होते. परंतु सोमवारी ५६९ वाहनांमधून  २९०३ टन भाजीपाला विक्रीला आला आहे. यामध्ये ५ लाख ३५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. राज्याच्या  विविध भागातून भाजीपाला विक्रीला येत आहे. वाटाणा मध्य प्रदेशमधून तर इतर काही वस्तूंची गुजरातमधून आवक होत आहे.

आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यापूर्वी फ्लॉवर ६ ते ८ रुपये किलो दराने विकला जात होता. आता हेच दर १४ ते २० रुपयांवर गेले आहेत. शेवग्याची शेंग ६० ते ८० वरून ७० ते १२० रुपयांवर गेले आहेत. 
हिरव्या मिरचीचा ठसकाही वाढू लागला आहे. गेल्या सोमवारी २० ते २८ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वाला मिरचीचे दर ४० ते ५० रुपायांवर पोहचले आहेत. टोमॅटो, वाटाणा, घेवडा, काकडी व इतर भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत. आवक कमी झाली असून मागणी वाढल्यामुळे दरामध्ये फरक पडला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

हिरव्या मिरचीचा ठसकाही वाढला
हिरव्या मिरचीचा ठसकाही वाढू लागला आहे. गेल्या सोमवारी २० ते २८ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वाला मिरचीचे दर ४० ते ५० रुपायांवर पोहचले आहेत. 

एपीएमसीमधील प्रतिकिलो दर 
भाजी    ९ जानेवारी    १६ जानेवारी 
फरसबी    १५ ते २५    २५ ते ४५
फ्लॉवर    ६ ते ८    १४ ते २० 
घेवडा    ३० ते ३६    ४० ते ६०
काकडी    १५ ते २२    १६ ते २४
ढोबळी मिरची    २० ते २८    २० ते ४०
शेवगा शेंग    ६० ते ८०    ७० ते १२०
टोमॅटो    ७ ते १०    १० ते १८
वाटाणा    १८ ते २६    २६ ते ३०
वांगी    १८ ते २४    २० ते ४०
भेंडी    २५ ते ५०    ३० ते ५२

Web Title: Inflation hits in the cold! In 8 days the rate of flower doubles, Chili also sevga rate increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.