वटपौर्णिमेच्या सामग्रीला महागाईच्या झळा

By Admin | Published: June 8, 2017 03:23 AM2017-06-08T03:23:25+5:302017-06-08T03:23:25+5:30

जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला

Inflation for inflation | वटपौर्णिमेच्या सामग्रीला महागाईच्या झळा

वटपौर्णिमेच्या सामग्रीला महागाईच्या झळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला असून बुधवारी आठवडे बाजारात वटसावित्रीच्या सामग्रीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. उपवासाचा हा दिवस मोठ्या श्रद्धेचा मानला जातो. आधुनिक काळातही त्याचा महिमा तसूभरही कमी झालेला नाही.
या व्रतासाठी विक्रमगडमधील नवविवाहीता तीन दिवस उपवास करुन चौथ्या दिवशी विधीवत पूजा करतात. त्या वेळेस पूजेसाठी लागणाऱ्या करंडाफणी, आंब्यांचे वाण, हळद-कुंकू, हिरव्या बांगडया, खारीक, बदाम, सुपारी, फणस यांचे दर वाढलेले आहेत.
वट पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यालाही महागाइची झळ बसली असून त्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहेत. आंबा एक नग ५ ते १० रुपये, करडांफणी ८ ते १० रुपये, हिरव्या बांगडया २५ ते ३० रुपये डझन, फणस गरा ४ ते ५ रुपये, खरीक एक नग ४ ते ५ रुपये, बदाम एक नग ४ ते ५ रुपये, हळद-कुंकू १५ ते २० रुपये, सुपारी एक नग ५ ते १० रुपये अशी वाढ झाली आहे.
>‘जुन्या परंपरा मोडल्या जात आहेत’
पूर्वी गावात एक ते दोनच ठिकाणी वडाखाली पूजा केली जात असे. परंतु, आता ही परंपरा लोप पावत चालेली असून ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागात वडाच्या फांद्या देवळात आणून अनेक ठिकाणी पुजा मांडल्या जातात. महिला आपल्या सवडीनुसार येऊन पूजा करतात़ पूर्वी असे नव्हते आता आधुनिक युगाबरोबर परंपराही मोडल्या जात आहेत़, अशी खंत विक्रमगड येथील ज्येष्ठ महिला कमल औसरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली.
वटपूजन दुपारी साडेबारापर्यंतच : दाते पंचाग
वटपौर्णिमा गुरुवारी ८ जून रोजी दुपारी ४़ ३० नंतर शुक्रवारपर्यत आहे़ पण चतुर्दशी ही गुरुवारी आहे़ आणि तिसऱ्या प्रहरापासून पूजन करावयाचे असते़ म्हणून पूजन हे गुरुवारी सूर्योदयापसून ते मध्यान्ह पर्यंत म्हणजेच दु़ १२.३० पर्यतच करणे बंधकारक आहे. तरी सर्व महिलांनी
दु. १२़ ३० पर्यतच पूजन करावे नवीन व्रत करणाऱ्यांनी सकाळी ७़ ते ८
व ११ ते १२़ ३० पर्यत पूजन करावे असे दाते पंचांगमध्ये म्हंटले आहे़
वटासावित्रीचे व्रत अतिशय पवित्र आणि मांगल्याचे मानले जाते़ त्यासाठी पौर्णिमेच्या आदल्या दोन दिवस व पौर्णिमा झाल्यावर चंद्रोदय होईपर्यत असे एकूण चार दिवस उपवास करतात.
- भुरी धवल पटेल,
अजूनही जुनी परंपरा विक्रमगड व ग्रामीण भागात महिलांनी जोपसली असून आधुनिक काळातही नवविवाहीत सौभाग्यवती आपल्या पतीसाठी चार दिवस उपवास करते व हे व्रत पूर्ण करते़
- रजनी अरुण मनारे ,
विक्रमगड

Web Title: Inflation for inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.