महागाईचं दुष्टचक्र!, डिझेलने तोंडचं पाणी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:37 PM2018-06-17T23:37:44+5:302018-06-17T23:37:44+5:30

इंधनाचा उडालेला भडका आणि मजुरीच्या वाढलेल्या दरांमुळे बळीराजापुढे महागाईचे दुष्टचक्र उभे राहिले आहे.

Inflation of inflation !, diesel ran away with water from the mouth | महागाईचं दुष्टचक्र!, डिझेलने तोंडचं पाणी पळविले

महागाईचं दुष्टचक्र!, डिझेलने तोंडचं पाणी पळविले

googlenewsNext

- योगेश बिडवई 
मुंबई : इंधनाचा उडालेला भडका आणि मजुरीच्या वाढलेल्या दरांमुळे बळीराजापुढे महागाईचे दुष्टचक्र उभे राहिले आहे. चार वर्षांत लीटरमागे ५७ रुपये असलेला डिझेलचा भाव आता ७१ रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे साहजिकच ट्रॅक्टरने नांगरणी करण्यापासून वाहतुकीपर्यंतचा खर्च सुमारे २० टक्क्यांनी वाढला आहे. राज्यात १० वर्षांत मशागतीचा खर्च तर जवळपास तीनपटीने वाढला
आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवनच पावसावर अवलंबून असते. शेतीचा खर्च वाढल्याने अल्पभूधारक शेतकºयांचे कुटुंब स्वत:च खरिपाची मशागत करतात. त्यांना मजूर परवडत नाही. चार महिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व कुटुंब शेतात राबते, तेव्हा कुठे पीक तरारते. मराठवाड्यात एकरमागे नांगरणी २००, वखर १००, पेरणी १०० रुपयांनी वाढली आहे.
>एकरी खर्च/रुपये
विभाग विदर्भ मराठवाडा प.महाराष्ट्र
/खान्देश
नांगरणी १७०० १६०० १६००
वखर ६५० ६०० ७००
पेरणी ७५० ७०० ७००
विदर्भात अडवणूक
मजुरांच्या टंचाईमुळे विदर्भात शेतकºयांची अडवणूक होते. परिणामी, मजुरीचा खर्च वाढतो. ट्रॅक्टरचा खर्चही अधिक आहे.
रोटावेटरचा खर्च वाढला
कांदे, हळद, ऊस, आले, बटाटे आदी पिकांसाठी रोटावेटर वापरले जाते. त्याचा खर्च ७०० वरून ८०० ते ८५० रुपयांवर गेला आहे.
>विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रात नांगरणीचा एकरी खर्च साधारणपणे 300 रुपयांनी वाढला आहे. रासायनिक खतांच्या किमतीतही ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. युरियाची बॅग ५० किलोवरून ४५ रुपये किलोची झाली आहे.

Web Title: Inflation of inflation !, diesel ran away with water from the mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.