रक्तदात्यांंची माहिती आता मोबाइल अॅपवर
By admin | Published: February 21, 2016 01:57 AM2016-02-21T01:57:59+5:302016-02-21T04:43:26+5:30
रक्तदात्यांची यादी त्यांच्या संपर्क पत्त्यासह देणाऱ्या एम.हेल्थ या मोबाइल अॅपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक
मुंबई : रक्तदात्यांची यादी त्यांच्या संपर्क पत्त्यासह देणाऱ्या एम.हेल्थ या मोबाइल अॅपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त हे मोबाइल अॅप तयार करण्यात आले असून, यात पाच हजार रक्तदात्यांची यादी संकलित करण्यात आली आहे. त्यात सरकारी, ट्रस्ट, खासगी रुग्णालयांची माहिती, रक्तपेढ्या, आजारपणात आर्थिक मदत करणाऱ्या संस्था, डायलिसिस सेंटर्स, हार्ट केअर, कॅन्सर केअर, रुग्णवाहिनी, शववाहिनी, २४ तास सेवा देणारी औषधांची दुकाने, जेनेरिक औषध दुकाने, पॅथॉलोजी सेंटर, आयुर्वेदिक रुग्णालये, होमिओपॅथी रुग्णालये, बर्न्स रुग्णालये, फिजिओथेरपी सेंटर्स, रुग्णसेवा देणाऱ्या संस्था, अवयवदानसंबंधी माहिती केंद्रे आणि रुग्णोपयोगी साहित्य पुरविणाऱ्या संस्थांची नावे, पत्ता व संपर्क आदी तपशील असेल. (विशेष प्रतिनिधी)