नवोपक्रमशील शाळांची माहिती आता गुगल फॉर्मवर

By admin | Published: October 20, 2015 02:47 AM2015-10-20T02:47:34+5:302015-10-20T02:47:34+5:30

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत राज्यात अप्रगत विद्यार्थीमुक्त शाळांचे लक्ष्य परीक्षा परिषदेने समोर ठेवले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून २०० नवोपक्रमशील शाळांची

Information about innovative schools is now available on Google Form | नवोपक्रमशील शाळांची माहिती आता गुगल फॉर्मवर

नवोपक्रमशील शाळांची माहिती आता गुगल फॉर्मवर

Next

- प्रवीण खेते,  अकोला
‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत राज्यात अप्रगत विद्यार्थीमुक्त शाळांचे लक्ष्य परीक्षा परिषदेने समोर ठेवले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून २०० नवोपक्रमशील शाळांची निवड करण्यात आली असून त्यांची माहिती गुगल फॉर्मवर टाकण्यात येत आहे.
राज्यातील प्रत्येक शाळा अप्रगत विद्यार्थीमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून विद्या परिषदेमार्फत नवोपक्रमशील शाळांची माहिती गोळा करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांमध्ये प्रत्येक केंद्रातून २ नवोपक्रमशील शाळांचा समावेश असणार आहे. या शाळांमधील भाषा व गणित या विषयाच्या प्रत्येकी एका शिक्षकाची निवड करून त्यांना विद्या परिषदेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षित शिक्षकांमार्फत या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे, जेणेकरून राज्यातील शाळा अप्रगत विद्यार्थीमुक्त होण्यास मदत होईल. गुगल फॉर्मवर आलेल्या नवोपक्रमशील शाळा या केंद्रातील इतर शाळांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याने केंद्र शासनाने यासाठी विशेष तरतूद केली आहे.
माहिती सादर करण्यात जिल्ह्याची पीछेहाट
राज्यातील नवोपक्रमशील शाळांची माहिती गुगल फॉर्ममध्ये नोंदवण्यासाठी नांदेड, रत्नागिरी, यवतमाळ हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्हा परिषद व महानगरपालिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत नवोपक्रमशील शाळांची निवड करण्यात येत आहे. राज्यातील शाळा अप्रगत विद्यार्थीमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- प्रकाश मुकुंद,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अकोला

विभागनिहाय नवोपक्रमशील शाळांची संख्या : पुणे : २०४, नागपूर : ४६१, औरंगाबाद : ४८२, मुंबई : २२९, कोल्हापूर : ४००, अमरावती : ४११, नाशिक : २८५, लातूर : ३९०

Web Title: Information about innovative schools is now available on Google Form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.