वाहनाचा नंबर टाकताच मिळू लागली माहिती
By admin | Published: January 25, 2016 01:04 AM2016-01-25T01:04:35+5:302016-01-25T01:04:35+5:30
कोणत्याही वाहनाचा नंबर टाकून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर मेसेज पाठविल्यानंतर काही सेकंदातच त्या वाहनाच्या मालकाचे नाव,
पुणे : कोणत्याही वाहनाचा नंबर टाकून ७७३८२९९८९९ या क्रमांकावर मेसेज पाठविल्यानंतर काही सेकंदातच त्या वाहनाच्या मालकाचे नाव, त्याचा पत्ता व वाहनाची इतर माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. चोरी, फसवणूक यांसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी तसेच त्या उघडकीस आणण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आतापर्यंत आरटीओ, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस यांच्याकडेच उपलब्ध असलेली ही माहिती आता सर्वसामान्यांना मिळू लागली आहे.
वाहनाच्या क्रमांकावरून त्याचे तपशील मिळविण्याचे अधिकार आतापर्यंत केवळ आरटीओ, पोलीस व वाहतुक पोलीस यांच्यापर्यंत मर्यादित होते. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यामार्फत ही माहिती मिळवावी लागत होती. मात्र, आता केवळ एका मेसेजच्या आधारे ही माहिती प्राप्त होऊ शकणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी याचा वापर होऊ शकेल. (प्रतिनिधी)