एकटक बघणाऱ्याला हटकलं म्हणून 'इन्फोसिस'च्या इंजिनिअरची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 07:46 AM2017-01-30T07:46:53+5:302017-01-30T12:25:23+5:30

हिंजवडी येथे इन्फोसिस कंपनीतील महिला इंजिनिअरची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Infosys kills the engineer as he strikes the viewer | एकटक बघणाऱ्याला हटकलं म्हणून 'इन्फोसिस'च्या इंजिनिअरची हत्या

एकटक बघणाऱ्याला हटकलं म्हणून 'इन्फोसिस'च्या इंजिनिअरची हत्या

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 30 - एकटक बघणाऱ्याला जाब विचारत तक्रार करण्याची तंबी दिल्याने इन्फोसिस कंपनीतील इंजिनिअर रसिला राजू ओपी हिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  आरोपी सुरक्षा रक्षकानं स्वत:च पोलिसांकडं तशी कबुली दिली. हत्या करून आसाममध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना हिंजवडी पोलिसांनी आज पहाटे मुंबईहून त्याला अटक केली.
(आरोपीच्या कुटुंबाने सोडले गाव!)
इन्फोसिस कंपनीच्या हिंजवडी फेज 2 मधील कार्यालयात रविवारी सायंकाळी कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिला ओपी हिची हत्या करण्यात आली. ही घटना समजल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी वेगाने हालचाली करून बबन नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन हा इन्फोसिस कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तर, रसिला राजू ओपी (वय वर्षे 24 ) ही त्याच कंपनीत कम्प्युटर इंजिनीअर म्हणून काम करीत होती.
 
बबनला एसडीबी 10 या इमारतीच्या नवव्या मजल्यावर ड्युटी लागली होती. रविवार असल्यामुळे या मजल्यावर कमी कर्मचारी होते. ही संधी साधून बबन रसिलाकडे एकटक नजरेने पाहत होता. त्यावरून रसिलानं त्याला 'असे काय पाहतो' म्हणत हटकले. ई मेलवरून तुझी तक्रार करते आणि नोकरी घालवते, असे म्हणून ती आत गेली; तेव्हा तो तिच्या पाठोपाठ मिटिंगरूममध्ये गेला. तिची माफी मागितली आणि कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून रसिलाची हत्या केला. त्यानंतर बबनने तेथून पळ काढला.
 
मूळगावी आसामला जाण्यासाठी तो मुंबईला गेला. दरम्यान, रसिला हिचा संपर्क होत नसल्याचे तिच्या वरिष्ठांनी कंपनीत कळवले होते. कंपनीतील अन्य सुरक्षा रक्षकांनी शोध घेतला असता रसिलाची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांना ही माहिती मिळताच कंपनीतील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बबनला मुंबई येथून पहाटे अटक करण्यात आली.
 
 
 
 
 

Web Title: Infosys kills the engineer as he strikes the viewer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.