‘इन्फोसिस प्राइझ’ पुरस्कार जाहीर

By admin | Published: November 17, 2015 01:00 AM2015-11-17T01:00:59+5:302015-11-17T01:00:59+5:30

इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने विज्ञान क्षेत्रातील सहा श्रेणीसाठी देण्यात येणाऱ्या ‘इन्फोसिस प्राइझ २0१५’ या पुरस्कार प्राप्त विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. पुरस्कार विजेत्यांमध्ये

The 'Infosys Prize' award was announced | ‘इन्फोसिस प्राइझ’ पुरस्कार जाहीर

‘इन्फोसिस प्राइझ’ पुरस्कार जाहीर

Next

मुंबई : इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने विज्ञान क्षेत्रातील सहा श्रेणीसाठी देण्यात येणाऱ्या ‘इन्फोसिस प्राइझ २0१५’ या पुरस्कार प्राप्त विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्चचे प्राध्यापक जी. रवींद्र कुमार यांचाही समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
इन्फोसिस सायन्स फाउंडेशनमार्फत २00९ पासून इन्फोसिस पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष आहे. यंदाचा अभियांत्रिकी व संगणक विज्ञान पुरस्कार जेएनसीएएसआर संस्था बंगळुरुच्या थेअरॉटिकल सायन्सेस युनिटचे प्राध्यापक उमेश वाघमारे यांना जाहीर झाला आहे, तर मानवता श्रेणीसाठी देण्यात येणारा पुरस्कार किंग्ज कॉलेज, लंडनचे प्रा. जोनार्दन गणेरी, लाइफ सायन्स पुरस्कार आयसीजीईबी, नवी दिल्लीचे डॉ. अमित शर्मा, गणिती विज्ञान पुरस्कार रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठ हावडाचे प्राध्यापक महान महाराज, फिजिकल सायन्सेस पुरस्कार टीआयएफआर संस्थेचे प्राध्यापक जी.रवींद्र कुमार आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे सीनिअर फेलो डॉ. श्रीनाथ राघवन यांना जाहीर झाला आहे, असे फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एस.डी. शिबुलाल यांनी सांगितले.

Web Title: The 'Infosys Prize' award was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.