नितिन गडकरी व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह

By admin | Published: September 9, 2016 04:45 PM2016-09-09T16:45:25+5:302016-09-09T18:52:11+5:30

महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांची सद्यस्थिती आणि येत्या काही वर्षांमधील नियोजन याचा आढावा घेणाऱ्या लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हचे आयोजन मुंबईमध्ये 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे

Infra Conclave will be present in the presence of Nitin Gadkari and Chief Minister | नितिन गडकरी व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह

नितिन गडकरी व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांची सद्यस्थिती आणि येत्या काही वर्षांमधील नियोजन याचा आढावा घेणाऱ्या लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हचे आयोजन मुंबईमध्ये 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. रस्ते, जलवाहतूक आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा या अंगानं कॉनक्लेव्हमध्ये सविस्तर चर्चा होणार असून त्यामुळे राज्याच्या व देशाच्या विकासाला चालना मिळेल असी अपेक्षा आहे.
 
 
कॉनक्लेव्हमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांमध्ये पुढील तज्ज्ञांचा समावेश आहे.
रस्त्यांच्या विकासाचे सादरीकरण - संजय पालवे (यस बँक), वाय. एम. देवस्थळी (एल अँड टी फायनान्स लि.), अभय लोधा (टॉप वर्थ), राघव चंद्रा (एनएचएआय)
बंदर विकास सादरीकरण - विनोद बहेती (यस बँक), संजय भाटिया (मुंबई पोर्ट ट्रस्ट), आर. के. अगरवाल (केंद्र सरकारचे प्रतिनिधी), अमिताभ वर्मा (अंतर्गत जलवाहतूक), नीरज बन्सल (जेएनपीटी)
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा - संजय सेठी (एमआयडीसी), भूषण गगराणी (सिडको), आशिश कुमार सिंग (पीडब्ल्यूडी), यु. पी. एस. मदान (एमएमआरडीए), आर. एल. मोपलवार (एमएसआरडीसी)
व्हिजन महाराष्ट्र - जयंत म्हैसकर (एमईपी इन्फ्रा), सज्जन जिंदाल (जेएसडब्ल्यू), अश्विनी भिडे (मुंबई मेट्रो), मिलिंद म्हैसकर (महाराष्ट्र सरकार)
हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून त्याचे सविस्तर वृत्तांकन लोकमत ऑनलाइन व वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Infra Conclave will be present in the presence of Nitin Gadkari and Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.