आयुर्वेदाच्या जोपासनेसाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन आवश्यक - श्रीपाद नाईक

By admin | Published: June 4, 2017 01:37 PM2017-06-04T13:37:49+5:302017-06-04T13:37:49+5:30

जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण

Infrastructure and Research Required to Develop Ayurveda - Shripad Naik | आयुर्वेदाच्या जोपासनेसाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन आवश्यक - श्रीपाद नाईक

आयुर्वेदाच्या जोपासनेसाठी पायाभूत सुविधा आणि संशोधन आवश्यक - श्रीपाद नाईक

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 -   जगभरात आयुर्वेद उपचार पध्दती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण भारताची ताकत ही आयुर्वेद आहे हे जगाला आपण दाखवून दिले पाहिजे . आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये पोहचवणे हे आमचे ध्येय आहे , आयुर्वेद जगाच्या भल्यासाठी आहे. आयुर्वेदाची जोपासना आणि प्रचार करायचा असेल तर त्यासाठी आपली पायाभूत सुविधा आणि संशोधन बळकट केले पाहिजे असे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईत आयोजित ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ आणि ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार सोहळ्य दरम्यान म्हणाले. ११८ वर्षांची दैदिप्यमान वाटचाल करणाऱ्या ‘साण्डू’ या जगविख्यात आयुर्वेद कंपनीने आपल्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात अविरत व निःस्पृह सेवा देणाऱ्या मान्यवर वैद्यांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित केला होता.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुर्वेदाचा महिमा कायम ठेवत लाखो रुग्णांच्या आयुष्यातील दुःख कमी करण्यास हातभार लावणाऱ्या वैद्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. वैद्य अनंत धर्माधिकारी (पुणे) आणि वैद्य मदन गुलाटी (चंदिगढ) यांना ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ पुरस्कार तसेच वैद्य सुविनय दामले (कुडाळ- सिंधुदुर्ग), वैद्य चंद्रकांत त्रिपाठी (जळगाव) आणि वैद्य मनोज उपाध्याय (सुरत- गुजरात) यांना ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक व साण्डू आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू’ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आयुर्वेद हे रामबाण उपचार पध्दती करावी असे आमचे प्रयत्न आहे. भारत आणि अमेरिका आयुर्वेदाचा प्रचार वाढवण्यासाठी लवकरच सामंजस्य करणार आहे असे हि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पुढे सांगितले.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात आयुर्वेदाशी संबधित विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन केले गेले. पहिल्या सत्रात “२१व्या शतकातील आयुर्वेदाची उपयुक्तता व शक्ती” या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या आयुर्वेद विभागाचे संचालक वैद्य कुलदीपराज कोहली
 यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर “बदलती संस्कृती..बदलता आहार” या विषयावर वैद्य श्री सुविनय दामले (सिंधुदुर्ग) यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात “कॅन्सर व आयुर्वेद” यावर वैद्य समीर जमदग्नी (पुणे) यांनी आपले विचार या कार्यक्रमात मांडले.
आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ब्रिटीशांच्या राजवटीच्या काळात मात्र या प्राचीन शास्त्रास तुच्छ समजण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती. पण नेमक्या याच काळात काही अत्यंत समर्पित अशा लोकांनी या अतुलनीय अशा वारशाच्या जपणूकीचा जणू ध्यास घेतला होता. या कार्यात साण्डू हे नाव आघाडीवर होते. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी मंत्राने प्रेरित होऊन १० मे १८९९ रोजी साण्डू ब्रदर्सनी आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये क्रांती आणण्याचे ठरविले. आयुर्वेदीक औषधांचा प्रसार आणि तळागाळातील लोकांनाही आयुर्वेदाचा लाभ या उदात्त आणि स्वच्छ हेतूंचा सतत पाठपुरावा हाच साण्डूच्या यशाचा पाया आहे. उच्च दर्जामुळे साण्डूची औषधे अत्यंत लोकप्रिय ठरली. १० मे १८९९ रोजी मुंबईत ठाकुरद्वार येथे सुरु झालेली फॅक्टरी नंतर वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी चेंबूर येथे हलविण्यात आली असे साण्डू’ आयुर्वेद कंपनीचे शशांक साण्डू यांनी सांगितले

Web Title: Infrastructure and Research Required to Develop Ayurveda - Shripad Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.