राज्यात २ लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:00 AM2022-11-22T10:00:14+5:302022-11-22T10:01:36+5:30
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
मुंबई : राज्यासह मुंबईत २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. चार महिन्यात राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाची माहितीही त्यांनी दिली.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्व मिळून मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सर्वोत्तम बनवू या, असे आवाहन त्यांनी केले.