शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंगळे

By admin | Published: March 19, 2017 02:00 AM2017-03-19T02:00:32+5:302017-03-19T02:00:32+5:30

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या

Ingle, president of the Sahitya Sahitya Sammelan | शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंगळे

शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंगळे

Next

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शिक्षण विकास मंच व महात्मा गांधी मिशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी बालाजी इंगळे यांची निवड करण्यात आलेली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे यांची निवड संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथे १५ व १६ एप्रिल रोजी हे संमेलन वसंतराव काळे स्मृती साहित्यनगरी, रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हन हिल्स, औरंगाबाद येथे संपन्न होईल. लिहित्या शिक्षकांना साहित्यिक अशी ओळख मिळावी, म्हणून त्यांच्याकडून अधिकाधिक साहित्य निर्मिती व्हावी, हा संमेलनाचा उद्देश आहे.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ साली पुण्यात पहिले राज्यस्तरीय शिक्षकांचे संमेलन पार पडले. या दोनदिवसीय संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवी संमेलन, कथाकथनासह सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. (प्रतिनिधी)

Web Title: Ingle, president of the Sahitya Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.