हुंड्यासाठी विवाहितेवर अमानुष अत्याचार

By admin | Published: August 18, 2016 06:50 AM2016-08-18T06:50:04+5:302016-08-18T06:50:04+5:30

कुदळवाडी येथील प्राधिकरणातील एका विवाहितेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना नात्याला अन् माणुसकीला काळिमा फासणारी आहे. माहेरहून २५ लाख रुपये आणावेत

Inhuman atrocities on Marriage for Dowry | हुंड्यासाठी विवाहितेवर अमानुष अत्याचार

हुंड्यासाठी विवाहितेवर अमानुष अत्याचार

Next

पिंपरी : कुदळवाडी येथील प्राधिकरणातील एका विवाहितेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना नात्याला अन् माणुसकीला काळिमा फासणारी आहे. माहेरहून २५ लाख रुपये आणावेत व मोटार घेऊन द्यावी, या मागण्यांसाठी विवाहितेचा छळ करून तिला दारू पाजून पतीसह सासरा व दीर यांनी अत्याचार केला. या प्रकरणी विवाहितेच्या छळासाठी मदत करणाऱ्या सासूविरुद्धही गुन्हा दाखल करून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी संबंधित नराधमांना निगडी पोलिसांनी बुधवारी अटक केली.
पती जयदीप शिवरतन शर्मा, दीर आकाशदीप शिवरतन शर्मा, सासरा शिवरतन गुलाबसिंग शर्मा आणि सासू सुनीता शिवरतन शर्मा (सर्व रा. नवीन प्राधिकरण, कुदळवाडी) अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मे २०१४मध्ये जयदीपचा विवाह झाला होता. त्यानंतर दोन वर्षांपासून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. माहेरहून पैसे आणण्यास सांगितल्यानंतर तिने प्रतिसाद दिला नाही. पैशाच्या मागणीसाठी अनेकदा मारहाण केली, टोचून बोलले, कितीही त्रास दिला; तरी मागण्या पूर्ण होत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर सासरच्या मंडळींनी छळाची नीचतम पातळी गाठल्याचा आरोप आहे.
आतापर्यंत घडलेल्या विवाहितेच्या छळाच्या घटनांच्या तुलनेत अत्यंत भयानक अशी ही घटना आहे. पती, सासरा आणि दीर यांनी तिला मारहाण करून विवस्त्र केले. दारू पाजून नाचायला लावले. त्या अवस्थेतील छायाचित्रे मोबाइलमध्ये काढली. तिघांनी तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे. या सर्व प्रकारात सासूनेही आरोपींना मदत केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिल्यानंतर आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Inhuman atrocities on Marriage for Dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.