शिक्षण की दीक्षा

By admin | Published: May 5, 2016 06:04 AM2016-05-05T06:04:20+5:302016-05-05T13:42:53+5:30

कार्टुनिस्ट व्हायचं असेल तर कुठल्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा, याचे उत्तर भारतात सापडत नाही. प्रभाकर वाईरकर आणि सुरेश सावंत या ज्येष्ठ कार्टुनिस्टच्या मते अशा औपचारिक

Initiation of teaching | शिक्षण की दीक्षा

शिक्षण की दीक्षा

Next

कार्टुनिस्ट व्हायचं असेल तर कुठल्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा, याचे उत्तर भारतात सापडत नाही. प्रभाकर वाईरकर आणि सुरेश सावंत या ज्येष्ठ कार्टुनिस्टच्या मते अशा औपचारिक शिक्षणाची आपल्याकडे व्यवस्था नाही. तशी ती पूर्णांशाने असूही शकत नाही. कारण कार्टुन काढण्यासाठी लागणारी दृष्टी उपजतच असावी लागते. ड्रॉइंग, कॉम्पोझिशन अशा अन्य अंगांच्या बाबतीत दीक्षा घेता येऊ शकते. पण मुदलात विसंगती टिपण्याची दृष्टी कोणालाही औपचारिक शिक्षणातून मिळण्याची शक्यता दुर्मीळच आहे. एक तर ही कला कष्टसाध्य आहे. प्रचंड मेहनतीची तयारी लागते. ती खूप कमी जणांकडे दिसते.

ज्येष्ठ कार्टुनिस्ट प्रभाकर वाईरकर यांनी लोकमतसाठी काढलेलं व्यंगचित्र

सावंत म्हणाले, कार्टुनिस्ट बनण्याची ओढ वा इच्छा असलेल्यांसाठी मी आणि मारिओ मिरांडांनी भारतीय विद्या भवन आणि झेवियर्समध्ये कोर्स घेतले. पण चिकाटीने मेहनत करणारी मुलं सापडत नाहीत, हाच अनुभव आला. प्रत्यक्ष कार्टुन काढणं हा सातत्याच्या सरावाचा भाग असला तरी सूचक भाष्य करण्यासाठी लागणाऱ्या संदर्भांचा भाता भरलेला ठेवण्यासाठी जेवढं वाचायला हवं तेवढं वाचन करायची तयारी नसते. पेन्सिल कशी धरावी याचा सल्ला देता येतो पण हात कार्टुन काढणाऱ्याचाच वळावा लागतो.

 

- सुरेश सावंत

 

 

 

 

 

 

 

ज्येष्ठ कार्टुनिस्ट सुरेश सावंत यांनी लोकमतसाठी खास रेखाटलेले खालील चित्र

Web Title: Initiation of teaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.