दुष्काळासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार हवा
By admin | Published: April 29, 2016 01:48 AM2016-04-29T01:48:59+5:302016-04-29T01:48:59+5:30
एन्हॉयर्नमेंटल फोरम व दौंड शुगरचे काम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत बारामती टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
देऊळगावराजे : सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दुष्काळाचा सामना करणे काळाची गरज असून, एन्हॉयर्नमेंटल फोरम व दौंड शुगरचे काम निश्चितच स्तुत्य असल्याचे मत बारामती टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
दौंड शुगर व एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीबेल व आलेगाव (ता. दौंड) येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण या कामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
एन्हॉर्यमेंटल फोरमची स्थापना गेली सहा वर्षांपूर्वी झाली. ओढे रुंदीकरणाचे काम करताना ग्रामस्थांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे या पुढील काळात पाणीबचतीचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
या वेळी दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले, दौंड शुगर व एन्हॉर्यमेंटल फोरमच्या संयुक्त विद्यमाने बोरीबेल व आलेगाव या गावांचे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम करण्यात आले. दौंड शुगरच्या माध्यमातून ड्रीपसारख्या योजना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या वेळी माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नियोजन केले पाहिजे. भाजपाचे नेते वासुदेव काळे, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे या मान्यवरांची भाषणे झाली. जिल्हा परिषद सदस्या मनीषा लव्हे, बोरीबेलच्या सरपंच हिराबाई आटोळे, उपसंरपच दत्ता पाचपुते, दत्ता खळदकर, रमेश पाचपुते, माऊली चव्हाण, हनुमंत पाचपुते, उत्तम आटोळे, शरद सूर्यवंशी, पिंटू पाचपुते, माऊली कापसे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
>बोरीबेल व आलेगाव येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण या कामांचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा
वासुदेव काळे म्हणाले की, कालचा दौंड तालुका बागायती होता. आता त्याची वाटचाल जिरायती भागाकडे सुरू झाली आहे. तेव्हा राजकीय जोडे बाजूला ठेवून पाण्यासाठी आणि दुष्काळ निवारण्यासाठी सर्र्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. कार्यक्रम वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे. मात्र कार्यक्रम कोणाचा आहे, याचा विचार न करता हिताचा हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून उपस्थितीत राहिलो आहे, अशीच भावना सर्व राजकीय पक्षांनी दुष्काळ निवारणासाठी केली पाहिजे.