सरावादरम्यान जखमी गोविंदाला अर्धागवायूचा झटका

By admin | Published: August 6, 2014 02:24 AM2014-08-06T02:24:28+5:302014-08-06T02:24:28+5:30

दहीहंडी सरावादरम्यान मानेच्या मणक्याला दुखापत झालेल्या राजेंद्र बैकर यांच्यावर केईएम रुग्णालयात मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Injured Gavinda got a half-an-hour jolt | सरावादरम्यान जखमी गोविंदाला अर्धागवायूचा झटका

सरावादरम्यान जखमी गोविंदाला अर्धागवायूचा झटका

Next
मुंबई : दहीहंडी सरावादरम्यान मानेच्या मणक्याला दुखापत झालेल्या राजेंद्र बैकर यांच्यावर केईएम रुग्णालयात मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया त्यांच्या मानेचा मणका जागेवर बसवण्यासाठी करण्यात आली. राजेंद्र हे पुन्हा चालू शकतील याची शाश्वती देता येत नाही. त्यांना बसलेल्या मारामुळे त्यांना अर्धागवायू झाल्याचे केईएम रुग्णालयाच्या ऑर्थाेपेडिक्स विभागाचे डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास राजेंद्र यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. दहीहंडी सरावादरम्यान राजेंद्र यांना मानेला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. त्यांच्या मानेवर भार पडल्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आणि मणका जागेवरून हलला होता. त्यांच्या स्नायूंनाही दुखापत झाली होती. जबर मारामुळे त्यांच्या मानेखालच्या शरीराला अर्धागवायू झाला आहे. यामुळेच त्यांच्या दोन्ही हातांची, पायांची हालचाल करणो त्यांना शक्य होणार नाही. आजची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ही प्रामुख्याने त्यांचा हललेला मणका जागेवर बसवण्यासाठी करण्यात आली होती, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले. श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळातर्फे राजेंद्र दरवर्षी दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी व्हायचे. आमचे मंडळ हे सरावादरम्यान सहाच थर लावते. राजेंद्र हा नेहमी दुस:या किंवा तिस:या थरावर चढायचा. रविवारी तो दुस:या थरावर चढला होता. तिस:या थरावर चढलेल्या मुलाचा जोर त्याच्या मानेवर पडला. आम्ही सगळ्य़ांनी मिळून दोघांनाही सांभाळले होते. कोणीही खाली पडले नाही. मात्र राजेंद्रच्या मानेला मार बसला होता. 
राजेंद्र हा खासगी नोकरी करतो. त्याची आर्थिक परिस्थिीती बेताचीच आहे. त्याला दोन लहान मुले आहेत. मात्र त्याच्या कुटुंबियांना मंडळातर्फे सर्व मदत करण्यात येणार आहे. त्यांना लागणारे आर्थिक सहाय्य मंडळ करेल, असे मंडळाच्या पदाधिका:यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Injured Gavinda got a half-an-hour jolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.