गणेशोत्सव मंडळाचा ‘तुकाराम गाथा’ वाचनाचा अभिनव उपक्रम

By Admin | Published: September 5, 2014 11:43 PM2014-09-05T23:43:16+5:302014-09-06T00:00:43+5:30

रिसोड तालुक्यात एवती येथे गणेशोत्सवादरम्यात तुकाराम गाथा वाचणाचा उपक्रम.

Innovative program of reading 'Tukaram Gatha' of Ganeshotsav Board | गणेशोत्सव मंडळाचा ‘तुकाराम गाथा’ वाचनाचा अभिनव उपक्रम

गणेशोत्सव मंडळाचा ‘तुकाराम गाथा’ वाचनाचा अभिनव उपक्रम

googlenewsNext

धनंजय ढेंगडे / रिठद
रिसोड तालुक्यांतर्गत येत असलेल्या येवती येथील ग्रामस्थ आठ वर्षापासून एक गाव एक गणपतीबरोबरच गणेशोत्सवादरम्यात तुकाराम गाथा वाचणाचे काम सातत्याने करीत आहेत.
येवती येथील ग्रामस्थांनी ८ वर्षापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून एक गाव एक गणपतीची संकल्पना अस्तित्वात आणली. यासाठी गावा तील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य यांच्यासह युवा कार्यकर्त्यांंनी विशेष सहकार्य करण्याचे काम केले. त्यावेळी तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष जाधव होते. गणेशोत्सवासोबतच ग्रामस्थांनी गावात संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्य़ाचा संकल्प केला. तो ते सातत्याने पार पाडत आहेत. यावर्षीच्या गणेशोत्सवातही गावत तुकाराम गाथेतील शब्द गावकुसात गुंजत असून त्यामुळे गावात धार्मीक वातावरणाची निर्मीती होण्यास मदत होत आहे. सुरुवातीला केवळ १0 ते १५ लोक यामध्ये सहभागी झाले होते. परंतू आजमीतीला अर्धेअधिक गाव या तुकाराम गाथा पारायणात सहभागी होत आहे. गावातील गणेमंदिराच्या एकूणचे सेवेची जबाबदारी पांडूरंग शिंदे पाहत आहेत. गणेशोत्सवाला अधिक धार्मीक बनविण्यासाठी गावात अखंड हरिनाम सप्ताह व नामसंकिर्तनाचेही आयोजन होत आहे. या उत्सवाकरिता गावातील ज्येष्ठ, युवकांसह महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.

** गाव करी ते कुणी ना करी याची प्रचिती येवतीवासियांनी आयोजीत केलेल्या तुकाराम गाथा पारायणातून येत आहे. चार दोन लोकांच्या विचारातून गणेशोत्सवाला अधिकाधिक धार्मीक बनविण्याच्या संकल्पनेतून पुढे आलेली ही संकल्पना आता गावकर्‍यांनी मिळून गावाची संकल्पना बनविली आहे. सारे गावच आजमितीला गणेशभक्तीसह तुकाराम गाथेत तल्लीन झाल्याचे चित्र असून येवतीवासी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने दाखवित असलेला एकोपा सर्वांसाठीच प्रेरणादायी असा आहे.

Web Title: Innovative program of reading 'Tukaram Gatha' of Ganeshotsav Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.