चौकशी अधिकारीच गोत्यात!

By Admin | Published: May 23, 2016 05:14 AM2016-05-23T05:14:13+5:302016-05-23T05:14:13+5:30

बाळगंगा सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी करीत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी सुनील कलगूटकर यांच्याविरुद्ध पाटबंधारे विभागातील अभियंत्याने गंभीर तक्रार केली

Inquire! | चौकशी अधिकारीच गोत्यात!

चौकशी अधिकारीच गोत्यात!

googlenewsNext

डिप्पी वांकाणी, मुंबई
बाळगंगा सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारांची चौकशी करीत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी सुनील कलगूटकर यांच्याविरुद्ध पाटबंधारे विभागातील अभियंत्याने गंभीर तक्रार केली असून, या तक्रारीची दखल घेत त्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. शिवाय, या प्रकरणात आपल्याच अधिकाऱ्याविरुद्ध प्रतिकूल अहवाल द्यावा लागल्याने एसीबीवरही नामुश्की ओढावली आहे.
बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कथित गैरव्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेची चौकशी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक कलगूटकर करत आहेत. हा तपास सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे खात्यातील कार्यकारी अभियंता सुभाष झगडे यांनी गेल्या ५ फेब्रुवारी रोजी मानवी हक्क आयोगाकडे कलगूटकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. कलगूटकर यांनी माझे अपहरण केले व रायगडमध्ये धरणासाठी पाहणीचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराला धनादेश (चेक्स) देण्यासाठी मला भाग पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे.
अभियंता झगडे यांच्या तक्रारीची दखल घेत मानवी हक्क आयोगाने एसीबीला चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक दत्ता कराळे यांनी नुकताच आपला चौकशी अहवाल सादर केला असून, त्यात कलगूटकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. एसीबीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या माहितीस दुजोरा दिला. मात्र, चौकशी अधिकारी झगडे यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Inquire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.