निवडणुकीतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी

By admin | Published: June 9, 2017 02:39 AM2017-06-09T02:39:32+5:302017-06-09T02:39:32+5:30

पनवेल महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे

To inquire about the corruption in the elections | निवडणुकीतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी

निवडणुकीतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया आणि निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र निंबाळकर हेच याप्रकरणी जबाबदार आहेत. त्यांना निलंबित करून सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त डॉ. नजीम जैदी यांच्याकडे लेखी तक्र ारीतून केली आहे.
साधारण तीन लाख मतदारांना राजकीय पक्षांकडून रोकड वाटप झाल्याचे बोलले जात आहे. यात सुमारे ३५० कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची चर्चा मतदानाच्या दोन दिवस आधीपासून सुरू असतानाही सहारिया, निंबाळकर यांच्या यंत्रणेने कोणत्याही प्रकारे आळा घातला नाही. भरारी पथके, पोलीस, आयकर आणि उत्पादन शुल्क खाते मूग गिळून गप्प होते, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि उपाध्यक्ष विजय काळे यांनी जैदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: To inquire about the corruption in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.