बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

By Admin | Published: June 23, 2016 06:56 PM2016-06-23T18:56:39+5:302016-06-23T18:56:39+5:30

बेहिशेबी मालमत्ता सापडल्याप्रकरणी कोकण पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंत्यासह अन्य तिघांवर शाहुपुरी (जि़. कोल्हापूर) येथे गुन्हा दाखल करण्यात आला

Inquiries filed against four accused | बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 23 - उत्पन्नापेक्षा १ कोटी ५९ लाख ७५ हजार ७६१ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याप्रकरणी कोकण पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंत्यासह अन्य तिघांवर शाहुपुरी (जि़. कोल्हापूर) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई सोलापूर व कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे़
सेवानिवृत्त पाटबंधारे विभागाचे अधिकारी बाळासाहेब भाऊसाहेब पाटील, पत्नी शुभलक्ष्मी बाळासाहेब पाटील, मुलगा उत्कर्ष पाटील, हर्षप्रतिक पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ सेवानिवृत्त अधिकारी पाटील यांची सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उघड चौकशी सुरू होती़ याकामी राज्यातील ९ पथके कार्यरत होते़ संशय येईल त्याठिकाणी पोलीसांनी छापे मारले़ पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस उपआयुक्त दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, पुणे, सांगली व सांगोला येथे छापे मारून बेहिशोबी मालमत्ता दडवून ठेवल्याची माहिती समोर आणली़ याप्रकरणी सहा़ पोलीस आयुक्त अरूण देवकर यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक यु़बी़आफळे हे करीत आहेत़

पुणे, सांगली, कोल्हापूर, सांगोला येथे मारले छापे

कोकण पाटबंधारे विभाग, मुंबईचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील यांनी बेहिशोबी मालमत्ता जमाविल्याप्रकरणाचा अर्ज आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगली, पंढरपूर, गुरसाळे, पन्हाळा, कागल, सांगोला आदी ठिकाणी छापे मारून बेहिशोबी मालमत्ता लपवून ठेवल्याचे समोर आणले़ याप्रकरणात बँक खाते, ठिकठिकाणी असलेली शेतजमीन, जागा, घरे, नातेवाईकांच्या नावे असलेली रक्कम आदींची चौकशी पोलीसांनी केल्याचे सांगण्यात आले आहे़
तक्रारी अर्जानुसार ही कारवाई करण्यात आली आहे़ या प्रकरणी विविध ठिकाणी छापे मारून बँक खातेही तपासण्यात आले होते़ कोणीही शासकीय/निमशासकीय लोेकसेवकाने त्यांचे ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादीत केले असल्यास निनावी अर्जाव्दारे तक्रार करावी़
-अरूण देवकर
सहा़ पोलीस आयुक्त, सोलापूर

Web Title: Inquiries filed against four accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.