जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:13 AM2018-07-13T06:13:51+5:302018-07-13T06:14:16+5:30

कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाईल. तसेच या संदर्भात आयआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

Inquiries from the High Level Committee on Swimming Swimming | जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी

जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी

Next

नागपूर : कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जाईल. तसेच या संदर्भात आयआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. अधिवेशनाच्या काळातच या संदर्भात आमदारांसोबत बैठक सुद्धा घेण्यात येईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य चंद्रदीप नरके व सत्यजित पाटील यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता.
जलजन्य आजारावर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना
राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये एप्रिल २०१८ मध्ये ५३५१२ पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली. त्यापैकी केवळ नऊ टक्के नमुन्यांचे पाणी दूषित आढळले असून जलजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली.
 

Web Title: Inquiries from the High Level Committee on Swimming Swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.