मुलांच्या छळप्रकरणी मांत्रिकाची चौकशी सुरू

By admin | Published: June 13, 2016 04:59 AM2016-06-13T04:59:05+5:302016-06-13T04:59:05+5:30

काही मुलांकडून बळजबरीने मंत्रजप करून घेणाऱ्या मनोज दुबे या मांत्रिकाची समता नगर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली

Inquiries of the mantrik in the investigation of child abuse | मुलांच्या छळप्रकरणी मांत्रिकाची चौकशी सुरू

मुलांच्या छळप्रकरणी मांत्रिकाची चौकशी सुरू

Next


मुंबई : धनदांडग्यांना सुखसमृद्धी मिळवून देण्याच्या नावाखाली काही मुलांकडून बळजबरीने मंत्रजप करून घेणाऱ्या मनोज दुबे या मांत्रिकाची समता नगर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. दोन वर्षांपासून दुबेने येथील बंदिस्त बंगल्यात थाटलेला बाजार पोलिसांनी शुक्रवारी धडक कारवाई करीत उधळून लावला होता.
दिवसाला एक हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून दुबे बिहारमधून मुले आणत असे. बंगल्यात त्यांना उपाशीपोटी एका पायावर उभे करून त्यांच्याकडून २४-२४ तास मंत्रजप करून घेण्यात येत असत. त्यामुळे या छळाला कंटाळून अनेक मुले त्याच्या तावडीतून पळून गेली. अखेर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी २८ मुलांची सुटका केली. त्यापैकी १२ जण अल्पवयीन असून, ते गेले दोन ते तीन महिन्यांपासून हा अत्याचार सहन करीत होते. पीडित मुलांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. पाटील यांनी दिली. 

Web Title: Inquiries of the mantrik in the investigation of child abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.