पाच हजार कोटींच्या वीज कंत्राटांची चौकशी
By Admin | Published: December 9, 2015 01:26 AM2015-12-09T01:26:27+5:302015-12-09T01:26:27+5:30
महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीने सहा वर्षांपूर्वी दिलेल्या पाच हजार ६६८ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभारणी कंत्राटांची चौकशी केली जाणार आहे.
राजेश निस्ताने, यवतमाळ
महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीने सहा वर्षांपूर्वी दिलेल्या पाच हजार ६६८ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभारणी कंत्राटांची चौकशी केली जाणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
‘५६६८ कोटींच्या कंत्राटानंतरही वीजवहनाचे जाळे अर्धवटच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल ऊर्जामंत्र्यांनी घेतली. तीन दिवसांत त्याचा अहवाल मागण्यात येत आहे. दोषी अधिकारी व कंत्राटदार कंपन्यांवरही कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
कंत्राटदार अर्धवट स्थितीत कामे सोडून गेल्याने, आता उर्वरित कामे तुकडे पाडून पूर्ण करावे लागत असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. वीज पारेषण कंपनीने राज्यात अतिउच्चदाब वाहिन्या व उपकेंद्र उभारणीसाठी २००९ मध्ये ५,६६८ कोटी रुपयांचे कंत्राट जारी केले होते. त्यातील ईसीआय कंपनीचे विदर्भातील कंत्राट रद्द झाले आहे.